एलआयसी विमा सखी योजना: महिलांना दर महिन्याला मिळणार 7000 रुपये, योजनेची माहिती जाणून घ्या

Published:
एलआयसी विमा सखी योजना: महिलांना दर महिन्याला मिळणार 7000 रुपये, योजनेची माहिती जाणून घ्या

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय जीवन विमा महामंडळाने ‘LIC विमा सखी योजना’ सुरू केली आहे. भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ची ही योजना विशेषतः महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवता येईल. या योजनेद्वारे महिलांना दरमहा उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचे जीवन सोपे होईल.

महिलांना एजंट बनण्याचे प्रशिक्षण दिले जाणार 

एलआयसी ‘विमा सखी’ योजनेचा उद्देश महिलांना एलआयसी एजंट म्हणून भरती करणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे आहे, जेणेकरून त्या उत्पन्न मिळवू शकतील. यासोबतच या महिलांच्या माध्यमातून आजूबाजूच्या गावांमध्ये आणि परिसरात विमा विषयी जनजागृती केली जाईल. या योजनेअंतर्गत विमा सख्यांना यशस्वी एजंट बनवण्यासाठी विशेष प्रशिक्षण, आर्थिक प्रोत्साहन आणि प्रचारासाठी सहाय्य दिले जाते.