Marathi News

फक्त १० मिनिटांत घरच्या घरीच बनवा बेबी सेरेलेक, जाणून घ्या रेसिपी

Published:
फक्त १० मिनिटांत घरच्या घरीच बनवा बेबी सेरेलेक, जाणून घ्या रेसिपी

जेव्हा बाळ सहा महिन्यांचं होतं, तेव्हा आईच्या दूधासोबतच त्याला घन आहार (सॉलिड फूड) देण्याची सुरुवात केली जाते. हा काळ प्रत्येक आईसाठी खूप भावनिक आणि जबाबदारीचा असतो. प्रत्येक आईची इच्छा असते की तिच्या बाळाला पौष्टिक, सहज पचणारा आणि सुरक्षित आहार मिळावा. अशा वेळी सगळ्यात आधी जो पर्याय मनात येतो, तो म्हणजे बेबी सेरेलेक.

पण बाजारात मिळणाऱ्या सेरेलेकमध्ये अनेकदा साखरेचे प्रमाण जास्त असते, जे दीर्घकाळात बाळाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. पण तुम्हाला माहीत आहे का, की केवळ १० मिनिटांत घरच्या घरी शुद्ध, पौष्टिक आणि सुरक्षित बेबी सेरेलेक तयार करता येतो?

बाळासाठी सेरेलेक बनवण्याची सोपी रेसिपी

साहित्य:

  • तांदूळ – २ मोठे चमचे

  • मूग डाळ – १ मोठा चमचा

  • मसूर डाळ – १ मोठा चमचा

  • गहू किंवा रवा – १ मोठा चमचा

  • शेंगदाणे – १ छोटा चमचा

  • बाजरी किंवा रागी – १ छोटा चमचा

कृती:
१. सर्व धान्ये आणि डाळी स्वच्छ धुवून सूर्यप्रकाशात थोडा वेळ वाळवा.
२. नंतर एकेक करून कोरडे भाजा, जोपर्यंत सौम्य वास येत नाही – लक्षात ठेवा, भाजताना जळू नये.
३. सर्व साहित्य थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या.
४. ही पूड एअरटाइट डब्यात साठवून ठेवा – २० दिवस सहज टिकते.

बाळाला खायला कसे द्यायचे:

  • १ छोटा चमचा तयार पूड घ्या आणि अर्धा कप पाणी मिसळा.

  • मंद आचेवर सुमारे ४ मिनिटे शिजवा.

  • हवे असल्यास थोडेसे तूप किंवा दूध मिसळू शकता.

  • थोडं गार झाल्यावर चमच्याने बाळाला खाऊ घाला.

बाजारात मिळणाऱ्या पर्यायांपेक्षा आईच्या हाताने तयार केलेला सेरेलेक अधिक पौष्टिक, सुरक्षित आणि स्वस्त असतो. तो प्रेम आणि पोषणाने भरलेला असतो. त्यामुळे पुढच्यावेळी दुकानातून सेरेलेक घेण्याआधी फक्त १० मिनिटात घरच्या घरी बनवण्याचा विचार नक्की करा. कारण बाळाला बाहेरच्या वस्तूंपासून जितकं लांब ठेवाल, तितकी त्यांची तब्येत चांगली राहील.

Follow Us :GoogleNews