मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर दिवसा मेगा ब्लॉक नाही, शनिवारी व रविवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक, कारण…

Written by:Astha Sutar
Last Updated:
प्रत्येक आठवड्याच्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतो, मात्र रविवारी (१७.0८.२०२५) रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक नसणार आहे.
मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर दिवसा मेगा ब्लॉक नाही, शनिवारी व रविवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक, कारण…

Sunday Mega Block : मुबईच्या रेल्वे लोकलबाबत एक महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील रेल्वे लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाते. दररोज लाखो मुंबईकर या रेल्वे लोकलमधून प्रवास करतात. दरम्यान, प्रत्येक आठवड्याच्या रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतो, मात्र रविवारी (१७.0८.२०२५) रोजी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक नसणार आहे. त्याऐवजी १६/१७.०८.२०२५ शनिवारी, व रविवारी १७.0८.२०२५ मध्यरात्री रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर मध्यरात्री मेगा ब्लॉक कुठे?

दरम्यान, १६/१७.०८.२०२५ (शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी ००.४० वाजल्यापासून ते १७.०८.२०२५ रोजी (पहाटे) ०४.४० वाजेपर्यंत रात्रीचा मेगा ब्लॉक राहणार आहे. हा ब्लॉक विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या मार्गिकेवर राहणार आहे. डाउन ५व्या मार्गावर धावणाऱ्या मेल व एक्सप्रेस गाड्या विद्याविहार ते ठाणे / कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. अप मेल व एक्सप्रेस गाड्यांचे वळण ६व्या मार्गावर धावणाऱ्या मेल व एक्सप्रेस गाड्या कल्याण/दिवा आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप जलद लाईनवर वळवल्या जातील. ब्लॉक दरम्यान १० ते १५ मिनिटे उशिरा असणार आहेत.

कल्याण-कसारा येथे विशेष ब्लॉक

१६/१७.०८.२०२५ रोजी (शनिवार/रविवार मध्यरात्री) कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाच्या कामाच्या संदर्भात थानसिट स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष वीज आणि वाहतूक ब्लॉक असणार आहे. कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाच्या कामाच्या संदर्भात थानसिट स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे १६/१७.०८.२०२५ (शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी विशेष वीज आणि वाहतूक ब्लॉक चालवणार आहे. हा ब्लॉक १६/१७.०८.२०२५ (शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी सकाळी ००.३० वाजेपासून सकाळी ०५.१५ वाजेपर्यंत (१७.०८.२०२५ पहाटे लवकर) चालवला जाईल.

हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक कुठे?

दिवसा मेन लाईन आणि हार्बर/ट्रान्स हार्बर लाईनवर कोणताही मेगा ब्लॉक चालवला जाणार नाही. उशिराने धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या/विशेष गाड्या परिचलनाच्या आवयकशकते प्रमाणे वळवण्यात येतील. हे देखभाल व मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधा राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews