मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!, जलसाठ्यात केवळ ९ टक्के पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचं आवाहन

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत पाणीसाठी खालावत चालला आहे. त्यामुळं जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जर सात तलावांत जोरदार पाऊस पडला तरच सात तलावातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होईल. परिणामी मुंबईकरांना वर्षभर पाणी पुरवठा पुरेल पुरेल शक्य होणार आहे. अन्यथा पाणी कपातीचे संकट ओढवणार आहे.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!, जलसाठ्यात केवळ ९ टक्के पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचं आवाहन

Mumbai Water Storages : मुंबईकरांसाठी पाण्याबाबत एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. तरी पण मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ ९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. आणि हा जलसाठी पुढील महिनाभर पुरु शकतो. जर पाऊस नाही पडला तर पाणी कपात करावी लागेल, असं पालिका प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळं पाणी जपून वापर असंही आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

तलावातील पाणी पातळी घटली…

दरम्यान, दीड कोटींपेक्षाही अधिक मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार आणि तुळशी या सात तलावातील पाण्याची पातळीत घट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळं तलावात पाणी साठा पुरेसा मुबलक नाही. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या या तलावत फक्त ९ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. आणि हा पाणीसाठी साधारण एक महिना पुरेल एवढा असल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.

पाणी कपाचीचे संकट?

मुंबईला सध्या दररोज 4 हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तर, मुंबईला पावसाळा संपल्यावर 1 ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी किमान 14,47,363 दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. तर, दुसरीकडे तलावांतील उपलब्ध पाणीसाठा झपाट्याने तळ गाठू लागला आहे. महापालिकेने शासनाकडून अगोदरच राखीव पाणीसाठा मंजूर करून घेतला आहे. मात्र, मुंबईत पाणीकपात सुरूु होऊ शकते. दरम्यान, येत्या तीन-चार दिवसात अपेक्षित पाऊस न पडल्यास राखीव पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.