PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन! अर्ज कसा कराल?

Published:
गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. आतापर्यंत देशभरातील लाखो-कोट्यवधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन! अर्ज कसा कराल?

PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. मात्र, माहितीअभावी किंवा योग्य प्रसार न झाल्यामुळे अनेक योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. अशाच उपयुक्त योजनांपैकी एक म्हणजे पंतप्रधान किसान मानधन योजना.

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून दर महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन दिली जाते. विशेषतः गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे. आतापर्यंत देशभरातील लाखो-कोट्यवधी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. तुम्हालाही या योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर पात्रता काय आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा—याची सविस्तर माहिती पुढे देत आहोत.

पंतप्रधान किसान मानधन योजना म्हणजे काय? PM Kisan Mandhan Yojana

पंतप्रधान किसान मानधन योजना ही एक पेन्शन आधारित योजना आहे. शेतकऱ्यांना वृद्धापकाळात नियमित आर्थिक आधार मिळावा, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पीएफ किंवा पेन्शनचा आधार असतो, मात्र शेतकऱ्यांसाठी असा निश्चित उत्पन्नाचा स्रोत नसतो. हाच विचार करून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.या  योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाते. PM Kisan Mandhan Yojana

PM Kisan Mandhan Yojana साठी काय अटी आहेत?

शेतकऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दरमहा किमान 55 रुपये ते कमाल 200 रुपये इतका हप्ता भरावा लागतो.
शेतकरी जेवढी रक्कम पेन्शन फंडात जमा करतो, तेवढीच रक्कम केंद्र सरकारकडूनही जमा केली जाते.
त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना अधिक सुरक्षित आणि स्थिर लाभ मिळतो.

पैसे कधी आणि कसे मिळतात?

शेतकरी 60 वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन जमा केली जाते. दुर्दैवाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या पत्नीला दरमहा 1,500 रुपये पेन्शन दिली जाते.

अर्ज कुठे आणि कसा करावा?

पंतप्रधान किसान मानधन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जावे.

अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

आधार कार्ड
बँक खाते तपशील
पॅन कार्ड
आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
सातबारा, आठ-अ यांसारखी शेतीशी संबंधित कागदपत्रे

विशेष बाब म्हणजे, पीएम किसान सन्मान निधी योजनेतून मिळणाऱ्या रकमेचा वापर या योजनेचा मासिक हप्ता भरण्यासाठी करता येतो.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews