देशभरात सायबर आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून ही बाब गंभीर चिंतेचा विषय बनली आहे. ऑनलाईन व्यवहार, मोबाईल अॅप्स, सोशल मीडिया आणि फसव्या लिंकद्वारे नागरिकांना गंडवले जात आहे. बनावट कॉल, ओटीपी मागणी, केवायसी अपडेटच्या नावाखाली होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणावर समोर येत आहे. अनेक वेळा सामान्य नागरिकांचे बँक खाते काही मिनिटांत रिकामे होत असून आर्थिक नुकसानासोबत मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.
दरम्यान आता सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची धामधूम आहे. दुसरीकडे सायबर भामटे तुमच्या बँक अकाऊंटवर नजर ठेवून बसले आहेत. नवीन वर्षाची सुरूवात होत असल्याने तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अनेक शुभेच्छा संदेश मिळतील. मात्र, काही सायबर आर्थिक फसवणुकीचे प्रकार देखील घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशेष सावधानता बाळगावी लागेल.
Happy New Year चा मेसेज आणि बँक अकाऊंट रिकामे
खरंतर नवीन वर्षात आपण एकमेकांना Happy New Year अथवा इतर अनेक शुभेच्छा संदेश पाठवतो असतो. अशा परिस्थितीत तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरूस apk files अथवा इतर लिंकच्या स्वरूपात शुभेच्छा संदेश मिळतील. दरम्यान ती फाईल ओपन केल्यास तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो. अथवा तुमचे बँक अकाऊंट रिकामे केले जाऊ शकते. त्यामुळे पुरेशी सावधानात बाळगणे आवश्यक आहे.
View this post on Instagram
नागरिकांनी विशेष सावधानता बाळगण्याची गरज
नवीन वर्ष हा उत्सव आणि आनंदाचा काळ असतो, अशा परिस्थितीत लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शुभेच्छा देतात. पण सायबर गुन्हेगार या संधीचा फायदा घेत आहेत. व्हॉट्सअॅपवर फेक Happy New Year मेसेज पाठवले जात असल्याने आता मोठा धोका निर्माण झाला आहे. थोडासा अभिवादन मेसेज आपल्या फोनवर व्हायरस स्थापित करू शकतो आणि बँक खात्यात प्रवेश मिळवू शकतो. सायबर तज्ज्ञ आणि पोलिसांनी अशा घोटाळ्याबाबत अलर्ट जारी केला आहे.





