Marathi News

Sinchan Pump Anudan Yojana : सिंचनासाठी सरकार देतय 90 टक्के अनुदान; पात्रता काय? अर्ज कसा करायचा?

Published:
शेती करताना सिंचनाची सुविधा खूप महत्त्वाची आहे. पाणीच नसेल तर शेती करूच शकत नाही. अशावेळी सिंचनाची सोय करायचं म्हटल तरी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. शेतकऱ्याच्या या समस्येवर मात करण्यासाठी आता सरकार सरसावल आहे.
Sinchan Pump Anudan Yojana : सिंचनासाठी सरकार देतय 90 टक्के अनुदान; पात्रता काय? अर्ज कसा करायचा?

Sinchan Pump Anudan Yojana । शेती करताना सिंचनाची सुविधा खूप महत्त्वाची आहे. पाणीच नसेल तर शेती करूच शकत नाही. अशावेळी सिंचनाची सोय करायचं म्हटल तरी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. शेतकऱ्याच्या या समस्येवर मात करण्यासाठी आता सरकार सरसावल आहे. सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या पंपसंच खरेदीवर तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी जास्तीत जास्त अनुदान रक्कम 40 हजार रुपये निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना 10 अश्वशक्ती (HP) क्षमतेपर्यंतचे डिझेल किंवा विजेवर चालणारे पंपसंच खरेदी करता येणार आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे शेती करत असताना सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. शेतकऱ्याच्या पिकाला भरपूर पाणी मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणजे पीक चांगलं येईल, बळीराजाचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्हीही वाढेल. विहीर, शेततळे किंवा प्लास्टिक अस्तर केलेले जलसाठे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होईल. या योजनेचा (Sinchan Pump Anudan Yojana) लाभ घेण्यासाठी पात्रता काय असेल? अटी काय असतील आणि कोणकोणती कागदपत्रे लागतील ते आज आपण जाणून घेऊयात.

पात्रता निकष – Sinchan Pump Anudan Yojana

अर्जदार शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्गातील असावा.
शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID) अनिवार्य राहील.
अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित असेल.
BPL (दारिद्यरेषेखालील) शेतकऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य राहील
BPL शेतकऱ्यांना जमिनीची वरची मर्यादा लागू नाही.
इतर शेतकऱ्यांकडे 0.40 ते 6 हेक्टर शेती असणे आवश्यक.
दुर्गम भागात 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यास एकत्र अर्ज केल्यास पात्रता मिळेल.

कागदपत्रे

जात प्रमाणपत्र
शेतकरी ओळख प्रमाणपत्र (Farmer ID)
आधार नंबर लिंक असलेले बँक खाते
BPL प्रमाणपत्र (लागू असल्यास)

असा करा अर्ज –

अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर अर्ज करावा.https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews