Soybean Procurement । राज्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याची हेक्टरी मर्यादा जाहीर करण्यात आली आहे. शेतकरी ज्या प्रमाणात आपल्या शेतात सोयाबीनची लागवड करतात, त्यानुसार त्यांना हेक्टरी ठरवलेल्या मर्यादेपर्यंतच सोयाबीन विकता येणार आहे. यावर्षी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन कमी झालं, तर काही जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे हेक्टरी मर्यादेत त्यानुसार क्विंटल मध्ये फरक पाहायला मिळतोय.
कोणत्या जिल्ह्यात सोयाबीन उत्पादन कमी –
राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांच्याकडुन १५ नोव्हेंबरपासून हमीभावाने सोयाबीनच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. या दोन संस्थांसाठी पणन मंडळ, मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ फेडरेशन या संस्था खरेदी करणार आहेत. हमीभावाने खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा (Soybean Procurement) ठरविली जाते. कृषी विभागाने दिलेल्या उत्पादकतेच्या आधारे खरेदीची मर्यादा जाहीर करण्यात आली. यंदा जळगाव, अहिल्यानगर, परभणी आणि नागपूर या जिल्ह्यांत सोयाबीनची उत्पादकता कमी असल्याने हेक्टरी मर्यादाही कमी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये उत्पादन जास्त झाल्याने सोयाबीनची हेक्टरी मर्यादा वाढवण्यात आली आहे.
हे ही वाचा
हेक्टरी मर्यादा म्हणजे काय? Soybean Procurement
हेक्टरी मर्यादा म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जितक्या हेक्टरवर पेरणी केली असेल आणि ती सातबारा उताऱ्यावर नोंद असेल, तितक्या हेक्टर साठी त्या शेतकऱ्याला मर्यादेनुसार खरेदी मिळते. उदाहरणार्थ, परभणी जिल्ह्याची हेक्टरी मर्यादा 13 क्विंटल आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने एक हेक्टरवर पेरणी केली असेल, तर सरकार त्याच्याकडून जास्तीत जास्त 13 क्विंटल सोयाबीन हमीभावाने खरेदी करेल.
जिल्हानिहाय हेक्टरी मर्यादा खालीलप्रमाणे –
कोल्हापूर – 24.50
पुणे – 23.50
सांगली – 23.35
सातार – 22.00
लातूर – 20.10
धाराशिव – 17.00
बीड – 17.50
अमरावती – 17.10
नाशिक – 15.00
सोलापूर – 15.00
जालना – 15.00
नंदुरबार – 12.47
परभणी – 13.30
नांदेड – 13.50
हिंगोली – 14.00
अहिल्यानगर – 14.50
अकोला – 14.50
यवतमाळ – 14.30
चंद्रपूर – 10.75
भंडारा – 10.75
नागपूर – 7.50
गडचिरोली – 7.21 (किमान)