Tiger Attack Man Viral Video : खुर्चीवर बसलेल्या माणसावर वाघाचा हल्ला? Viral Video मागील सत्य काय??

Published:
Last Updated:
Tiger Attack Man Viral Video : खुर्चीवर बसलेल्या माणसावर वाघाचा हल्ला? Viral Video मागील सत्य काय??

आजकाल सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल (Tiger Attack Man Viral Video) होताना दिसतात. यापैकी बरेच व्हिडिओ एआय-जनरेटेड असतात. लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी काही जण एआय चुकीचा वापर करतात. म्हणजे हे व्हिडिओ दिसताना खरे वाटतात परंतु प्रत्यक्षात तसं काहीच घडलेलं असतं आरटीफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून हे व्हिडिओ एडिट केलेले असतात. असाच एक व्हिडिओ मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एक वाघ बाहेर खुर्चीवर बसलेल्या माणसावर हल्ला करताना दिसतोय.

काय आहे व्हिडिओत (Tiger Attack Man Viral Video)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस त्याच्या घराबाहेरील मोकळ्या जागी खुर्चीवर बसला आहे. याच दरम्यान, दुसऱ्या बाजूने एक वाघ धावत येतो आणि त्या माणसावर थेट हल्ला करतो. या हल्ल्यानंतर त्या माणसाचे तोंड पकडून वाघ त्याला फरफडत घेऊन जाताना दिसतो. हिम्मू नावाच्या वापरकर्त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि दावा केला आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील चंद्रपुरी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी फॉरेस्ट गेस्ट हाऊसमधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग आहे. या व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ उडाली. मात्र सत्य वेगळेच निघाले. (Tiger Attack Man Viral Video)

काय आहे सत्य

इंडिया टीव्हीच्या फॅक्ट-चेक टीमने या व्हायरल व्हिडिओची तपासणी केली. व्हायरल व्हिडिओमध्ये तारीख आणि वेळ सीसीटीव्ही फुटेजसारखीच दिसते. तारीख, ३१-०८-२०२५, व्हायरल व्हिडिओच्या खाली वेळसह दिसते, सकाळी ६:४२ वाजता. इंडिया टीव्हीच्या तपासात असे आढळून आले की हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) द्वारे तयार करण्यात आला आहे. याशिवाय, भारताची सरकारी संस्था असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या तथ्य-तपासणी विभागाने या व्हिडिओची सत्यता पडताळली केली असता कितीही हा व्हिडिओ बनावट असल्याचे सिद्ध झाले. PIB ने म्हटले आहे की अशी कोणतीही घटना घडली नाही.