MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; अचानक तापमानात घट; आजचे हवामान कसे असेल?

Written by:Rohit Shinde
Published:
तीन ते चार दिवसांपासून राज्यात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 10 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
Weather Update: महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; अचानक तापमानात घट; आजचे हवामान कसे असेल?

आता देशभरात थंडीचं पर्व सुरू झालं असून, खऱ्या अर्थानं हिवाळा सुरू झाल्याच्या वृत्तावर केंद्रीय हवामान विभाग अर्थात IMD नं शिक्कामोर्तब केलं आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात हळूहळू थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वातावरणात गारवा वाढलेला जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 10 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत तापमानाचा पारा आणखी खाली येण्याची शक्यता आहे.

तापमान घसरले; थंडीचा कडाका वाढला !

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 10 नोव्हेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत कोरडे आणि उष्ण वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईतील कमाल सुमारे 34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात मुख्यतः निरभ्र आकाश राहून कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यातील कमाल तापमान 31 अंश, सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत थंड आणि कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यातील कमाल तापमान 31 अंश, सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत थंड आणि कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर शहराच्या तुलनेत थंडीचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. तेथील कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत निरभ्र आकाश राहून वातावरणात गारवा जाणवण्याची शक्यता आहे. विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर येथील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.

मुंबई-कोकणात हवापालट; किनारी भागात थंडी

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला पाऊस अखेर ओसरू लागला असून कोकण किनारपट्टीवर आता थंडीची चाहूल लागली आहे. हवामानात स्पष्ट बदल जाणवत असून, दिवस उष्ण आणि रात्री गारवा वाढताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला पाऊस अखेर ओसरू लागला असून कोकण किनारपट्टीवर आता थंडीची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामानात स्पष्ट बदल जाणवत असून, दिवस उष्ण आणि रात्री गारवा वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार ?

दरम्यानच्या काळात आता देशभरात थंडीचं पर्व सुरू झालं असून, खऱ्या अर्थानं हिवाळा सुरू झाल्याच्या वृत्तावर केंद्रीय हवामान विभाग अर्थात IMD नं शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, मध्य आणि उत्तर भारतात थंडी हळूहळू वाढू लागली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. पूर्व भारतात तत्काळ मोठा बदल अपेक्षित नसला तरी दोन दिवसांनंतर थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. एकूणच, देशात दक्षिणेकडे पावसाचं आणि उत्तर-मध्य भागात थंडीचं वातावरण दिसून येत असून, पुढील आठवडाभर हवामानात लक्षणीय बदल होणार आहेत.