Healthy Drinks : Coffee नाही, या ४ पेयांनी झोप छू मंतर होईल, आळस आला तर फक्त एक ग्लास भरून प्या!

Written by:Smita Gangurde
Published:
दुपारचं जेवण घेतल्यानं अनेकांना झोपेवर आवर घालणं कठीण होतं. यामुळे ते कामातही लक्ष केंद्रीत करू शकत नाही.
Healthy Drinks : Coffee नाही, या ४ पेयांनी झोप छू मंतर होईल, आळस आला तर फक्त एक ग्लास भरून प्या!

4 Healthy Drinks : दुपारच्या वेळेत थकवा किंवा सुस्ती येणं तसं सामान्य आहे. विशेषत: दुपारचं जेवण घेतल्यानं अनेकांना झोपेवर आवर घालणं कठीण होतं. यामुळे ते कामातही लक्ष केंद्रीत करू शकत नाही. आता या परिस्थितीत अधिकांश लोक कॉफी पितात. मात्र कॉफीचा परिणाम काही वेळासाठी राहतो. कॉफीमधील कॅफीनमुळे तुम्ही काही वेळासाठी अॅक्टिव्ह तर होता, मात्र काही तासांनी पुन्हा एनर्जी क्रॅश होऊ लागते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवतो.

याशिवाय कॉफी प्यायल्याने अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आम्ही तुम्हाला कॉफीशिवाय चार अशा ड्रिंक्स सांगणात आहोत, ज्यामुळे तुमची झोप छू मंतर होईल आणि तुम्ही अॅक्टिव्ह होऊ काम करू शकाल. हे ड्रिंक प्यायल्याने तुमची एकाग्रता वाढेल आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकाल.

झोप उडवण्यासाठी ही पेय ठरतील फायदेशीर…

कुकुंम्बर मिंट कोकोनट कूलर…

नारळ पाण्यात काकडी, पुदीना आणि लिंबाचा रस घालून १०-१५ मिनिटं झाकून ठेवा आणि एक एक घोट घेत प्या. या पेयातून तुमचा आळस दूर होईल. नारळ पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, काकडी हायड्रेट ठेवतो आणि पुदीना पचनशक्ती वाढवतो. अशा प्रकारचं पेय तुमचा मेंदू आणि शरीराला अॅक्टिव्ह करुन फोकस वाढविण्यास मदत करेल.

लिंबू-मध इलेक्ट्रोलाइट पेय

पाण्यात लिंबू पिळून त्यात थोडं मध घाला. यातून तुम्हाला उत्साही वाटेल. ऑफिसमध्ये ज्यूस घेणं शक्य होत नसेल तर तुम्ही सोबत मधाची बाटली आणि लिंबू घेऊन जाऊ शकता. आणि दुपारच्या वेळेत थंड पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या. तुम्हाला फ्रेश वाटेल.

गाजराचा रस

जेव्हा तुम्हाला आळस वाटत असेल तेव्हा तुम्ही गाजराच्या रसात चिमूटभर मीठ घालून पिऊ शकता. त्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात, जी डिहायड्रेशन रोखतात आणि त्वरित ऊर्जा देऊन फोकस वाढवतात.

ताक

यासर्वांशिवाय आळस वाटत असेल तर तुम्ही एक ग्लास तास पिऊ शकता. थंड तास कॅल्शियम, प्रोटीन आणि विटॅमिन बीचा चांगला स्त्रोत आहे. हे सर्व घटक तुम्हाला अलर्ट आणि फ्रेश ठेवण्यास मदत करतात.

या ४ पेयांपैकी एक निवडून, तुम्ही स्वतःला अॅक्टिव्ह ठेवू शकता किंवा दररोज वेगवेगळे पेय देखील घेऊ शकता.