रोज सकाळी-सकाळी पोटात गॅस होतो? पचनक्रिया सुधारण्यासाठी बदला ‘या’ ५ सवयी

Published:
पचन सुधारण्यासाठी आणि पोटफुगी टाळण्यासाठी, तुम्हाला काही सवयींकडे लक्ष देण्याची आणि त्या सवयी सुधारण्याची गरज आहे.
रोज सकाळी-सकाळी पोटात गॅस होतो? पचनक्रिया सुधारण्यासाठी बदला ‘या’ ५ सवयी

Remedies for gas in the stomach in the morning:   बहुतांश लोकांना सकाळी-सकाळी पोटात जास्त गॅस किंवा पोटफुगी ही एक सामान्य समस्या आहे. ती बऱ्याचदा चुकीच्या खाण्याच्या सवयी किंवा बिघडलेल्या दिनचर्येमुळे होते. अधूनमधून गॅस होणे सामान्य आहे. परंतु जर तुम्हाला दररोज सकाळी पोटफुगी आणि जडपणा जाणवत असेल, तर ते तुम्हाला तुमचा आहार आणि सवयी बदलण्याची आवश्यकता असल्याचे लक्षण आहे.

तुमचे पचन सुधारण्यासाठी आणि पोटफुगी टाळण्यासाठी, तुम्हाला काही सवयींकडे लक्ष देण्याची आणि त्या सवयी सुधारण्याची गरज आहे. त्यामुळेच आज आपण गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या ते जाणून घेऊया….

रात्री उशिरा जेवणे-
खूप उशिरा खाल्ल्याने, विशेषतः जड आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते. झोपेच्या वेळी पोट मंदावते, ज्यामुळे गॅस होऊ शकतो. त्यामुळे रात्रीचे जेवण झोपेच्या २-३ तास ​​आधी घ्या.

रात्री जास्त खाणे –
झोपण्यापूर्वी जड अन्न खाल्ल्याने पचनावर जास्त ताण येतो.
त्यामुळे रात्री खिचडी, उकडलेल्या भाज्या, सूप किंवा दलिया असे हलके आणि संतुलित जेवण घ्या.

जास्त जंक फूडचे सेवन-
दररोज कमी फायबर आणि त्याउलट जास्त जंक फूडचे सेवन केल्याने पचन मंदावू शकते. हे टाळण्यासाठी, तुमच्या आहारात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये समाविष्ट करा.

कमी पाणी पिणे –
कमी पाण्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता आणि पचन मंदावू शकते.ज्यामुळे पोटात गॅस तयार होऊ शकतो. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर १-२ ग्लास कोमट पाणी प्या आणि दिवसभर दर १-२ तासांनी एक ग्लास कोमट पाणी पित राहा.

चहा आणि कॉफी –
रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिल्याने आम्लता होऊ शकते. ज्यामुळे सकाळी गॅस होऊ शकतो. चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी २-३ बदाम, खजूर किंवा शेंगदाणे खा. विशेषतः, रात्रीच्या जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिणे टाळा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews