Foods that increase acidity: तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण हिरव्या भाज्या किंवा दुग्धजन्य पदार्थ यांसारखे अनेक निरोगी पदार्थसुद्धा तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक असू शकतात. जर तुम्ही फक्त ते निरोगी वाटतात म्हणून ते तुमच्या आहारात समाविष्ट करत असाल, तर काही पदार्थांमुळे आम्लपित्तदेखील होऊ शकते. बऱ्याचदा, जेव्हा तुम्ही निरोगी पदार्थ खाता तेव्हा तुम्हाला आम्लपित्त होते आणि तुमच्या पोटात गॅस होते.
आहारात काही पदार्थ असे असतात ज्यामुळे पित्त रिफ्लेक्स होऊ शकते. आज आपण असेच काही पदार्थ जाणून घेणार आहोत ज्यामुळे आम्लपित्त होऊ शकते. चला जाणून घेऊया हे पदार्थ नेमके कोणते आहेत……
ओट्स –
अनेकजण दररोज सकाळी नाश्त्यात दुधासोबत ओट्स किंवा संपूर्ण धान्य खातात. कारण ओट्स आणि संपूर्ण धान्य रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि पोटासाठी चांगले असतात. त्यामध्ये फायबरचे प्रमाण देखील जास्त असते. परंतु जर शरीरात पाणी कमी झाले आणि फायबरचे सेवन वाढले तर गॅस आणि पोट फुगण्याची शक्यता वाढते. पोटात गॅसचा दाब वाढतो.
फळे-
लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात आणि शरीराला हायड्रेट करतात. रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी या फळांची शिफारस केली जाते. पण ही लिंबूवर्गीय फळे नैसर्गिकरित्या खूप आम्लयुक्त असतात. म्हणून, रिकाम्या पोटी किंवा मोठ्या प्रमाणात त्यांचे सेवन केल्याने अन्ननलिकेच्या अस्तरांना त्रास होऊ शकतो, ज्यामुळे जळजळ आणि पोटात गॅस होऊ शकते.
डार्क चॉकलेट-
तज्ज्ञांच्या मते, डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात सेवन केल्यास फायदे मिळतात. डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर असतात. परंतु हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की डार्क चॉकलेटमध्ये काही संयुगे असतात जे खालच्या अन्ननलिकेतील स्फिंक्टरला आराम देतात.जो स्नायू पोटात आम्ल ठेवतो. जेव्हा स्नायू खूप आराम करतात तेव्हा आम्ल परत येते. ज्यामुळे जळजळ आणि गॅस होते.
दुग्धजन्य पदार्थ-
कमी फॅट असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि अनेक लोकांना आराम देखील देतात.परंतु काही लोकांना दुग्धजन्य पदार्थांमुळे पोट फुगण्याचा अनुभव येतो आणि काहींना दुग्धजन्य पदार्थ पचवण्यास त्रास होतो. जे लोक थंड दूध, दही किंवा ताक खातात त्यांनी त्यांचे पोट संवेदनशील आहे का ते तपासावे. जर पोट संवेदनशील असेल तर ते आम्ल रिफ्लक्स करू शकते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






