Ayurvedic remedies for increasing appetite: बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकदा लोकांना भूक न लागण्याची समस्या जाणवते. काहीच समस्या नसताना भूक लागत नाही. अशावेळी लोक गोंधळात पडतात. त्यामुळे अनेकदा स्वतःहून औषधे, टॉनिक किंवा प्रोटीन घ्यायला चालू करतात. अशाने शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. परंतु ही समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेद सहजपणे मदत करू शकते. विशेष म्हणजे आयुर्वदिक उपायाने शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. आज आपण भूक न लागण्याच्या समस्येसाठी काही आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया…..
डाळिंबाचा रस-
भूक लागण्याची समस्या असेल तर, त्यासाठी डाळिंबाचा रस प्रचंड फायदेशीर आहे. डाळिंबाचा रस तोंडाचा कडवटपणा दूर करून पचन सुधारते. यासाठी एक ग्लास डाळिंबाच्या रसात सेंधा मीठ आणि एक चमचा मध घालून त्याचे सेवन करावे. त्यामुळे तुम्हाला कडकडून भूक लागेल.
दालचिनी-
भूक वाढवण्यासाठी आयुर्वेदात दालचिनीचा वावर केला जातो. यासाठी एका ग्लास पाण्यात दालचिनी, बडीशेप, वेलची आणि धणे रात्रभर भिजत घालावे. सकाळी उठून हे पाणी उकळून ते कोमट झाल्यावर प्यावे. असे केल्याने पोट स्वच्छ होते शिवाय भूक लागण्यासही मदत होते.
आवळा-
भूक वाढवण्यासाठी आवळासुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी एक चमचा आवळा पावडर घेऊन त्यात एक चमचा तूप आणि एक चमचा मध मिसळून ही पेस्ट खा. असे केल्याने भूक लागण्यास मदत होईल. शिवाय अनेक शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होईल.
चिंच-
चिंच म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चिंच फक्त चवीलाच उत्तम नाही. तर आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. भूक वाढवण्यासाठी ३० ग्राम चिंच गरम पाण्यात ३० मिनिटांसाठी भिजत ठेवा. नंतर त्यातील पल्प पिळून रस काढून घ्या. आता यामध्ये ओवा घालून पेस्ट बनवून घ्या. जेवणाच्या आधी एक चमचा हे मिश्रण खा. त्यामुळे तोंडाची चव सुधारेल आणि भूक लागण्यास मदत होईल.
तुळशीचे पाणी-
आयुर्वेदात तुळशीला अतिशय महत्व आहे. तुळशी विविध आरोग्य समस्या दूर करण्यासाठी मदत करते. भूक लागण्यासाठी तुळशीची काही पाणी एका ग्लास पाण्यात उकळून घ्या. पाणी अर्धे शिल्लक राहिल्यास प्या. असे केल्याने भूक लागण्यास मदत होईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





