टाळूवर नियमित लावा व्हिटॅमिन ई, केसांना मिळतील फायदेच-फायदे

Published:
हिवाळ्यात केस गळण्याची अनेक कारणे आहेत. कोरडे टाळू, वारंवार केस धुणे आणि गरम पाण्याचा वापर केल्याने केस कमकुवत होऊ शकतात.
टाळूवर नियमित लावा व्हिटॅमिन ई, केसांना मिळतील फायदेच-फायदे

Benefits of Vitamin E for Hair:   हिवाळ्यात थंड हवामानामुळे आणि प्रदूषणामुळे त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यावरही खोलवर परिणाम होऊ शकतो. या ऋतूत अनेकांना केस गळतीचा त्रास होतो. थंड वारे आणि कमी आर्द्रता यामुळे टाळू कोरडे होऊ शकते. त्यामुळे केस कमकुवत होऊन तुटू शकतात. शिवाय, केसांची योग्य काळजी न घेणे आणि पौष्टिकतेची कमतरता देखील ही समस्या वाढवू शकते.

हिवाळ्यात केस गळण्याची अनेक कारणे आहेत. कोरडे टाळू, वारंवार केस धुणे आणि गरम पाण्याचा वापर केल्याने केस कमकुवत होऊ शकतात. शिवाय, जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता, ताणतणाव आणि खराब आहार देखील केसांची मुळे कमकुवत करू शकतो. आज आपण टाळूची आणि केसांची काळजी घेण्यात व्हिटॅमिन्स ई कशी मदत करते याबाबत जाणून घेऊया…..

डोक्यातील कोंडा दूर करते-
डोक्यातील कोंडा किंवा खाज सुटणे, व्हिटॅमिन ई ने सहजपणे बरे करता येते. व्हिटॅमिन ई मध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात जे टाळूवरील खाज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्याच्या वापरामुळे डोक्यातील कोंडा देखील कमी होतो.

टाळूला हायड्रेट करते-
हिवाळ्यात किंवा अति उष्णतेमध्ये टाळू कोरडे होऊ शकते. व्हिटॅमिन ई टाळूमध्ये ओलावा टिकवून ठेवते, कोरडेपणा आणि खाज कमी करते. ते केस मऊ आणि निरोगी बनवते.

केस गळती कमी करते-
व्हिटॅमिन ई मध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे केस गळणे कमी करण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या टाळूला व्हिटॅमिन ई तेलाने मालिश करता तेव्हा ते रक्त प्रवाह सुधारते आणि केसांची मुळे मजबूत करते. यामुळे केस गळणे कमी होते आणि केस जाड होतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews