पावसाळ्यात किचनमधील साहित्य खराब होण्याची भिती वाटतेय? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

Published:
पावसाळ्यात ओलाव्यामुळे किचनमधील साहित्य खराब होण्याची शक्यता असते. यासाठी काही सोपे उपाय करता येतात.
पावसाळ्यात किचनमधील साहित्य खराब होण्याची भिती वाटतेय? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

How to Store Kitchen Ingredients Properly During Monsoon:  पावसाळा येताच, आपण काही चविष्ट नाश्त्यासह चहा पार्टीचा आनंद घेतो. पावसाळा हा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सर्वोत्तम काळ आहे. परंतु , या हंगामात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून वाचण्यास मदत होईल.

आम्ही तुमच्यासाठी काही युक्त्या आणि टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही पावसाळ्यात तुमचे घर आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवू शकाल. तसेच किचनमधील साहित्य खराब होण्यापासून रोखू शकता.

 

स्वयंपाकघर चांगले स्वच्छ करा-

भांडी धुणे आणि काउंटरटॉप स्वच्छ करण्याव्यतिरिक्त, तुमच्या स्वयंपाकघरातील ओल्या वस्तू ठेवलेल्या प्रत्येक जागेची स्वच्छता करा. यामुळे मुंग्या, कीटक किंवा डास तुमच्या उरलेल्या अन्नात येण्यापासून रोखतील.

 

गळतीवर लक्ष ठेवा-

पावसाळा सुरू होण्यापूर्वी, घरात, विशेषतः स्वयंपाकघरात कोणत्याही प्रकारच्या गळतीवर लक्ष ठेवा. पावसामुळे गटारे ओसंडून वाहतात आणि नळांमधून गळतीमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. ज्यामुळे स्वयंपाकघरात एक विचित्र वास येतो.

 

स्वयंपाकघरात हवा खेळती ठेवा-

स्वयंपाकघराच्या खिडक्या उघड्या ठेवा. जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा स्वयंपाकघरातील धूर आणि ओलावा पूर्णपणे काढून टाकला आहे याची खात्री करा, अन्यथा स्वयंपाकघरात वेगवेगळ्या ठिकाणी बुरशी निर्माण होऊ शकते. म्हणून, स्वयंपाक केल्यानंतर जमा होणारी वाफ, ओलावा, वास आणि धूर काढून टाकण्यासाठी एक्झॉस्ट फॅन किंवा एअर क्लीनर वापरा.

 

मसाले थंड आणि कोरड्या जागी ठेवा-

आर्द्रतेमुळे सर्वात आधी प्रभावित होणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे मसाल्याचा डबा. पावसाळ्यात घरात ठेवलेले मसाले ओले होतात. म्हणून, मसाल्यांचा ताजेपणा आणि शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी मसाल्यांचा योग्यरित्या संग्रह करणे महत्वाचे आहे.

 

स्वयंपाकघरातील फरशी स्वच्छ ठेवा-

मुंग्या, झुरळे आणि माश्या यांसारखे कीटक पावसाळ्यात घरात येण्याची संधी शोधतात. त्यांना दूर ठेवण्यासाठी, तुमच्या स्वयंपाकघरात कीटकनाशक द्रव वापरा. त्याने फरशी स्वच्छ करून घ्या. जेणेकरून कीटकांचा वावर होणार नाही.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews