Remedies for beard and mustache growth: आजकाल तरुणांमध्ये बिअर्ड लूक म्हणेजच दाढी वाढवणे फारच ट्रेंडिंग आहे. म्हणूनच, बहुतेक तरुण दाटसर दाढी दिसण्यासाठी विविध पद्धती वापरतात. काही लोकांच्या दाढी अनुवांशिकदृष्ट्या लगेच वाढतात, तर काहींच्या आनुवांशिकदृष्ट्या हळू वाढतात. तसेच तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण काही तरुणांना चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे दाढी वाढण्यास समस्या येते.
जर तुमची दाढी चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे वाढत नसेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या आहारात काही साधे बदल करून तुमची दाढी वाढवू शकता. तुमचा आहार आणि जीवनशैली बदलून तुम्ही बिअर्ड लूक करू शकता. जाणून घेऊया हे पदार्थ नेमके कोणते आहेत…..
ट्यूना फिश –
बाजारात तुम्हाला अनेक प्रकारचे मासे मिळतील. हे सर्व मासे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ट्यूना फिशसुद्धा या माशांपैकी एक आहे. हा मासा खाल्ल्याने तुमच्या दाढीची वाढ सुधारू शकते. ट्यूना फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. शरीरात ओमेगा फॅटी अॅसिड वाढल्याने केसांच्या मुळांची निर्मिती होण्यास मदत होते. तुमच्या दाढीच्या केसांची वाढ सुधारण्यासाठी तुम्ही ट्यूना फिशचे सेवन करू शकता.
दालचिनी –
दालचिनी आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. दालचिनी खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढते, रक्ताभिसरण सुधारते. केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण सुधारल्याने ऑक्सिजनची पातळी देखील सुधारते, ज्यामुळे केसांची वाढ दाट होते. सकाळी कोमट पाण्यासोबत मध आणि दालचिनीचे पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पालक –
पालक ही आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक आवडती भाजी आहे. त्यात व्हिटॅमिन ए, आयर्न, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. या सर्व पोषक तत्वांचे सेवन केल्याने दाढीच्या केसांची वाढ होते आणि मऊ होतात तसेच मेंदूचे आरोग्य टिकून राहते. जर तुम्हाला दाढीच्या केसांची चांगली वाढ करायची असेल, तर तुमच्या आहारात पालकचा रस आणि भाज्यांचा समावेश करा.
भोपळ्याच्या बिया –
भोपळ्याच्या बिया केसांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. जर तुम्हाला दाढी वाढवायची असेल तर भोपळ्याच्या बिया खाण्याचा प्रयत्न करा. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक भरपूर प्रमाणात असते. जो केसांच्या वाढीस प्रोत्साहन देणारा एक शक्तिशाली पोषक घटक आहे. भोपळ्याच्या बिया उन्हात पूर्णपणे वाळवा. त्या भाजून घ्या आणि खा. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






