Who should not eat black pepper: भारतीय घरांमध्ये काळी मिरी आवर्जून पाहायला मिळते. हा मसाला असण्यासोबतच एक औषधी पदार्थसुद्धा आहे. काळी मिरी प्रत्येकजण खाऊ शकतो. ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जवळजवळ प्रत्येक घरात याचा वापर केला जातो. ती अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. तज्ज्ञांच्या मते ती हृदयरोग, कर्करोग आणि जळजळ-संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे.
तसेच वृद्धत्व कमी करण्यासाठी देखील ती उपयुक्त मानली जाते. त्यामुळे काळी मिरी खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. असे असूनही, काही लोकांनी काळी मिरी खाणे टाळावे. आज आपण काळी मिरी कोणासाठी त्रासदायक ठरू शकते याबाबत जाणून घेऊया….
किडनी किंवा लिव्हरची समस्या –
किडनी किंवा लिव्हरसंबंधित रोग असलेल्या लोकांनी काळी मिरी टाळावी. कारण काळी मिरी किडनी किंवा लिव्हरचे कार्य बिघडवू शकते. काळी मिरी खाल्ल्याने या अवयवांना काम करण्यात दबाव येऊ शकतो. काळी मिरी पचवण्यासाठी शरीराला जास्त काम करावे लागू शकते. त्यामुळे रुग्णाची स्थिती बिघडू शकते.
पोटात अल्सर –
पोटात अल्सर असलेल्या लोकांनी काळी मिरी खाणे टाळावे. पोटात अल्सरमुळे पोटदुखी, मळमळ आणि खाण्याच्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिड रिफ्लेक्स असलेल्यांनीही काळी मिरी टाळावी. काळी मिरीमध्ये अनेक संयुगे असतात ज्यामुळे पोटात अल्सर आणि अॅसिड रिफ्लेक्स होऊ शकतात.
गर्भवती महिला –
गर्भवती महिलांनी काळी मिरी खाऊ नये. तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांनीही ते खाणे टाळावे. गर्भधारणेदरम्यान जास्त प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने गर्भाशयाचे आकुंचन होऊ शकते. यामुळे नऊ महिन्याआधी प्रसूती होऊ शकते आणि प्रसूतीदरम्यान इतर अनेक समस्यादेखील होऊ शकतात.
गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज –
काळी मिरी इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, इन्फ्लीमेंट्री बॉवेल डिसीज आणि गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज सारख्या परिस्थिती वाढवू शकते. म्हणून, या रुग्णांनी काळी मिरी खाणे टाळावे. ज्यांना ऍलर्जी किंवा संवेदनशील त्वचा आहे त्यांनी देखील काळी मिरी खाणे टाळावे. यामुळे खाज सुटू शकते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





