Ayurvedic Remedies to Improve Blood Circulation: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगले रक्ताभिसरण आवश्यक आहे. खराब रक्ताभिसरणामुळे थकवा, अशक्तपणा, जखमा हळूहळू बरे होणे, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि दम लागणे अशा समस्या होऊ शकतात. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी लोकांना नियमितपणे व्यायाम करण्याचा, निरोगी आहार घेण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि भरपूर झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.
परंतु यासाठी काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा देखील वापर केला जाऊ शकतो. आज आपण रक्ताभिसरण सुधारण्यासाठी काही महत्वाच्या औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेऊया…..
लसूण-
मसाला म्हणून वापरले जाणारे लसूण हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात अँटी इन्फ्लीमेंट्री , अँटी बॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्याचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास, शरीराला डिटॉक्स करण्यास, जळजळ कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. लसूण हृदयाचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत करते.
आले-
आले अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात औषधी गुणधर्मदेखील आहेत. त्याचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.
अर्जुनाची साल-
अर्जुनाची साल, एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्याचे सेवन केल्याने हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते, हृदयाचे कार्य सुधारते, हृदयरोग रोखण्यास, शरीराला डिटॉक्स करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.
अश्वगंधा-
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली आयुर्वेदिक वनस्पती, अश्वगंधा सेवन करणे रक्ताभिसरणासाठी फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने दीर्घकालीन ताण कमी होण्यास आणि रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. अश्वगंधा लाल रक्तपेशीआणि हिमोग्लोबिनची संख्या दोन्ही वाढवते. लाल रक्तपेशींची पातळी वाढल्याने व्यायाम करणाऱ्या स्नायूंना थेट ऑक्सिजन पोहोचवण्याची क्षमता वाढते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






