Foods that improve memory: आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात, मेंदू तीक्ष्ण करणे आणि स्मरणशक्ती सुधारणे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेंदू हा शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा देणारा अवयव आहे. जो शरीराच्या एकूण उर्जेच्या अंदाजे २०% ऊर्जा वापरतो. चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी, मेंदूला आवश्यक पोषक तत्वे सेवन करणे आवश्यक आहे.
मेंदूला तीक्ष्ण कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांच्या मते काही पदार्थ असे आहेत जे लक्ष केंद्रित करण्यास, स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत करतात. आज आपण या पदार्थांबाबत जाणून घेऊया…..
हळदी-
हळदीतील कर्क्यूमिनमध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे मेंदूच्या आरोग्यास चालना देतात. कर्क्यूमिन मेंदूच्या पेशींपर्यंत पोहोचून थेट त्यांना फायदा देते. ते मेंदूतील नवीन न्यूरॉन्सच्या वाढीस प्रोत्साहन देते. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. आणि तुमचा मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते.
हिरव्या पालेभाज्या-
पालक आणि ब्रोकोलीमध्ये मेंदूचे आरोग्य राखणारे अनेक महत्त्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. दररोज एक वाटी हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य सुधारू शकते. त्यामुळे डॉक्टर नेहमीच आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करण्याचा सल्ला देतात.
नट्स-
नट्समध्ये निरोगी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात जी मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड मेंदूच्या पेशींच्या वाढीस आणि कार्यास मदत करते. त्यातील झिंक स्मरणशक्ती मजबूत करते आणि मानसिक आरोग्य सुधारते.
डार्क चॉकलेट-
डार्क चॉकलेटमध्ये कोको फ्लेव्होनॉइड्स, कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे मेंदूचे कार्य सुधारतात. ते मूड देखील सुधारते आणि तणाव कमी करते. ते खाल्ल्याने लक्ष केंद्रित होते आणि एकाग्रता सुधारते, मानसिक थकवा दूर होतो आणि स्मरणशक्ती सुधारते. म्हणून, दररोज २०-३० ग्रॅम डार्क चॉकलेट (७०% कोको असलेले) खा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





