BSNL January Offer: आजकाल सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी आपल्या लाखो ग्राहकांना जबरदस्त प्रीपेड प्लॅनची ऑफर देत आहे. यामध्ये असे काही धमाकेदार प्लॅन सामील आहेत जे तुम्हाला खाजगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये अजिबातच मिळणार नाहीत. कंपनी केवळ परवडणाऱ्या किमतीत अधिक डेटाच देत नाहीय तर या प्लॅनसह इतर अनेक फायदे देखील देत आहे. किंमती न वाढवता, कंपनीने डेली डेटाची मर्यादा वाढवली आहे.
ही खास BSNL ऑफर 31 जानेवारीपर्यंत वैध असेल.म्हणजेच वापरकर्ते त्याच किमतीत अधिक डेटाचा आनंद घेऊ शकतात. BSNL ने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही प्रभावी ऑफर जाहीर केली आहे.ज्यामध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही जास्त रकमेशिवाय १ रुपयात २ जीबी डेटा देण्याचे आश्वासन दिले आहे. चला जाणून घेऊया हा प्लॅन नेमका काय आहे…..
हे ही वाचा
BSNL ची ऑफर-
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर या प्लॅनची घोषणा केली. त्यांच्या एक्स पोस्टमध्ये, कंपनीने लिहिले की, “बीएसएनएलच्या ₹१ च्या ऑफरसह २०२६ ची सुरुवात एक उत्तम सुरुवात आहे. हे अनलिमिटेड कनेक्टिव्हिटी, २ जीबी डेली डेटा आणि ३० दिवसांसाठी १०० एसएमएस/दिवस देते. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या जवळच्या बीएसएनएल सीएससी किंवा रिटेलरला भेट द्या. ही ऑफर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वैध आहे. बीएसएनएल वेबसाइट किंवा बीएसएनएल सेल्फ-केअर अॅपद्वारे देखील ते ऍक्टिव्ह केले जाऊ शकते.”
नेमका प्लॅन काय-
या ऑफरमध्ये दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. तसेच दिवसाला १०० एसएमएससुद्धा मिळणार आहेत. परंतु ही ऑफर ३० दिवसांसाठी असणार आहे. १जानेवारीपासून ते ३१ जानेवारीपर्यन्त ही ऑफर लागू आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)