दुग्धजन्य पदार्थांपेक्षाही वेगाने वाढेल कॅल्शिअम, फक्त खा ‘हे’ पदार्थ

Published:
काही लोकांना कॅल्शिअम वाढवायचे असते पण दूध किंवा दुधाचे पदार्थ अजिबात आवडत नाहीत.
दुग्धजन्य पदार्थांपेक्षाही वेगाने वाढेल कॅल्शिअम, फक्त खा ‘हे’ पदार्थ

Calcium-rich foods:   आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे हाडांशी संबंधित समस्या वाढत आहेत. कधीकधी, शरीरात कॅल्शियमची कमतरता देखील हाडांशी संबंधित समस्या वाढवते. बहुतांश लोक कॅल्शिअम वाढवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ खातात.

परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना दूध किंवा दुधाचे पदार्थ अजिबात आवडत नाहीत. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण दुग्धजन्य पदार्थांपेक्षाही जास्त असते. चला जाणून घेऊया या पदार्थाबाबत….

मेथी-
मेथीची पाने दुग्धजन्य पदार्थांप्रमाणेच कॅल्शियमने समृद्ध असतात. कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही आहारात मेथीचा समावेश करून मेथीचे पराठे, मेथीची कढी इत्यादी खाऊ शकता.

राजगिरा –
कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही राजगिरा देखील खाऊ शकता. यासाठी तुम्ही राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्यांची भाकरी आणि राजगिरा दलिया इत्यादी खाऊ शकता.

नाचणी-
नाचणी हाडांसाठी एक रामबाण उपाय आहे. जर तुम्हाला हाडांच्या कमकुवतपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही नाचणीचे सेवन करू शकता. नाचणी कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. १०० ग्रॅम नाचणीमध्ये किमान ३४५ मिलीग्राम कॅल्शियम असते. ती खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

तीळ –
तीळ खाणे हा हाडांशी संबंधित समस्यांसोबतच इतर अनेक आजारांवरदेखील रामबाण उपाय आहे. तीळ कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहेत आणि त्यात मॅग्नेशियम देखील चांगले असते. जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.

चिया सीड्स-
चिया सीड्समध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. जे केवळ हाडे मजबूत करत नाहीत तर ऑस्टियोपोरोसिस आणि संधिवाताचा धोका देखील कमी करतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews