तुमच्या मुलाचे हस्ताक्षर खराब आहे का? काळजी करू नका! ‘या’ टिप्स वापरून पहा

Published:
डिजिटल युगातही सुंदर हस्ताक्षर महत्त्वाचे आहेत. पेनाची योग्य पकड आणि नियमित सरावाने मुलांचे हस्ताक्षर सुधारता येते.
तुमच्या मुलाचे हस्ताक्षर खराब आहे का? काळजी करू नका! ‘या’ टिप्स वापरून पहा

आजच्या युगात, स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे मुलांचे जीवन अनेक प्रकारे बदलले आहे. त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रातही दिसून येतो. पूर्वी मुले तासंतास पुस्तके वाचत असत आणि लिहिण्याचा सराव करत असत, पण आजकाल ते त्यांचा बहुतेक वेळ मोबाईल स्क्रीनवर घालवतात. या डिजिटल गोष्टींचा मुलांच्या हस्ताक्षरावर नकारात्मक परिणाम होत आहे. मोबाईल स्क्रीनवर टाइपिंग आणि स्वाइप केल्याने हातांचे स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे लिहिताना पेन धरण्यास त्रास होतो. बऱ्याचदा मुलांना लेखनात कमी गुण मिळतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो. या समस्येला तोंड देण्यासाठी, पालकांनी मुलांना मोबाईल फोनचा जास्त वापर करण्यापासून रोखणे आणि त्यांना वाचन आणि लेखन करण्यास प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे. प्रत्येक पालकांसाठी मुलांचे भविष्य आणि शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असते. काही मुले सुरुवातीच्या काळात अभ्यासाकडे जास्त लक्ष देत नाहीत आणि शाळा आणि अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतात हे स्वाभाविक आहे. याचा त्यांच्या हस्ताक्षरावरही परिणाम होऊ शकतो. तुम्ही ‘या’ काही सोप्या मार्गाने मुलांचे हस्ताक्षर सुधारू शकता.

योग्य पेन ग्रिप

पेन किंवा पेन्सिल धरण्याची योग्य पद्धत मुलांना शिकवा. काही मुलांना पेन घट्ट धरण्याची किंवा चुकीच्या पद्धतीने धरण्याची सवय असू शकते, ज्यामुळे हस्ताक्षर खराब होते. त्यांना योग्य ग्रिप शिकवून ते सहज आणि योग्य पद्धतीने लिहू शकतात. मुलांनापेन किंवा पेन्सिल योग्य प्रकारे पकडण्याची पद्धत शिकवा. चुकीची पेन्सिल पकडल्याने हस्ताक्षर खराब होऊ शकते.

अक्षरलेखन सराव

मुलांना नियमितपणे अक्षरलेखन सराव करा. त्यांना अक्षरे, शब्द आणि वाक्ये लिहून पाहण्यासाठी प्रोत्साहित करा. साध्या शब्दांपासून सुरुवात करा, जसे की, ‘अ’, ‘आ’, ‘इ’ आणि हळूहळू अधिक अवघड शब्दांकडे जा.  मुलाला वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्स आणि कागदावर लिहिण्याचा सराव करा. मुलांना सुरुवातीला चार रेषेच्या कागदावर लिहायला द्या, नंतर दोन रेषेच्या कागदावर लिहायला द्या.

प्रेरणा

मुलांना हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रेरणा द्या. त्यांना चांगले हस्ताक्षर असण्याचे फायदे सांगा, जसे की, वाचायला सोपे आणि सुंदर. त्यांना चांगले हस्ताक्षर करण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि त्यांना यश मिळाल्यास कौतुक करा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)