चीनमधून उगम पावणाऱ्या नद्या भारतातील कोणत्या राज्यांतून वाहतात? लोक त्यांच्यावर किती अवलंबून? जाणून घ्या

Published:
Last Updated:
ब्रह्मपुत्र नदीचा उगम चीनच्या ताब्यातील तिबेटमधील मानसरोवर सरोवराजवळ होतो. प्रवाहाच्या दृष्टीने ही जगातील नवव्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे.
चीनमधून उगम पावणाऱ्या नद्या भारतातील कोणत्या राज्यांतून वाहतात? लोक त्यांच्यावर किती अवलंबून? जाणून घ्या

चीनमधून उगम पावणाऱ्या नद्या भारतातील कोणत्या राज्यांतून वाहतात? लोक त्यांच्यावर किती अवलंबून? जाणून घ्या

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार संपुष्टात आणला आहे. याअंतर्गत भारत आता ना पाकिस्तानसोबत या नद्यांचे पाणी वाटून घेईल, ना या नद्यांशी संबंधित कोणताही डेटा शेअर करेल.

दरम्यान, आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे की चीनने देखील २०२२  नंतर भारतासोबत नद्यांशी संबंधित कोणताही डेटा शेअर केलेला नाही. माध्यम रिपोर्ट्सनुसार माहितीच्या अधिकाराअंतर्गत (RTI) याची पुष्टी झाली आहे.

माहिती अशी आहे, की चीनमधून भारतात येणाऱ्या दोन प्रमुख नद्यांबाबत दोन्ही देशांमध्ये करार झाला होता, ज्याअंतर्गत चीन त्या नद्यांशी संबंधित हायड्रॉलॉजिकल डेटा भारतासोबत शेअर करायचा.

ही माहिती समोर आल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की नेमकं कोणत्या नद्या चीनमधून भारतात येतात? या नद्या भारताच्या कोणत्या राज्यांतून वाहतात आणि किती लोकसंख्या या नद्यांवर अवलंबून आहे?

ब्रह्मपुत्र नदी

ब्रह्मपुत्र नदीचा उगम चीनच्या ताब्यातील तिबेटमधील मानसरोवर सरोवराजवळ होतो. प्रवाहाच्या दृष्टीने ही जगातील नवव्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. सुमारे २९०० किमी लांब असलेली ही नदी चीन, भारत आणि बांगलादेशमधून वाहते. यापैकी सुमारे १७०० किमीचा भाग चीनमध्ये आहे आणि भारतात ती सुमारे ९१६ किमीपर्यंत वाहते. चीनमध्ये या नदीला ‘यारलुंग त्सांगपो’ म्हणतात, तर भारतात प्रवेश करताच ती ‘ब्रह्मपुत्र’ म्हणून ओळखली जाते. भारतात ही नदी अरुणाचल प्रदेशातून असमकडे जाते आणि तेथून बांगलादेशात प्रवेश जाते.

सतलज नदी
भारताच्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली सतलज नदीही तिबेटमध्ये उगम पावते. ही नदी राक्षसताल सरोवराजवळील लांगचेन खबाब हिमनद (ग्लेशियर) येथून उगम पावते. भारतात ही नदी हिमाचल प्रदेशातील शिपकी ला दर्र्याजवळून प्रवेश करते आणि नंतर पंजाबमध्ये जाते. शेवटी, ही नदी पाकिस्तानात सिंधू नदीमध्ये मिळते.

सिंधू नदी

सिंधू नदीचा उगमही तिबेटमधील मानसरोवर सरोवर आणि कैलास पर्वताजवळील सेंग खबाब ग्लेशियरपासून होतो. तिबेटमधील काही अंतर पार केल्यानंतर ही नदी लडाखमध्ये प्रवेश करते. नंतर ही नदी जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानात जाते आणि शेवटी अरबी समुद्रात विलीन होते.

Follow Us :GoogleNews