टॉयलेटमध्ये तासन्तास बसूनही शौचास होत नाही? ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास पोट होईल साफ

Published:
बदलेली जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आतड्यांची हालचाल नीट होत नाही. त्यामुळे पोट साफ होण्यास अडचण येते.
टॉयलेटमध्ये तासन्तास बसूनही शौचास होत नाही? ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास पोट होईल साफ

Remedies for constipation:   बहुतांश लोकांना पोट साफ न होण्याची समस्या असते. यालाच बद्धकोष्ठता असे म्हणतात. बद्धकोष्ठता ही पोटाशी संबंधित समस्या आहे ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जर तुमचे पोट सकाळी व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर तुमचा मूड दिवसभर खराब राहतो. जर बद्धकोष्ठता लवकरात लवकर बरी झाली नाही तर ती इतर अनेक आजारांना जन्म देऊ शकते.

बदलेली जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आतड्यांची हालचाल नीट होत नाही. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. आज आपण आतड्यांची हालचाल सुलभ करणाऱ्या काही पदार्थांबाबत जाणून घेऊया. जे खाल्ल्याने शौचास साफ होण्यास मदत होते…..

दही-
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे आतड्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात आणि आतड्यांची हालचाल करण्यास मदत करतात. ज्यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

किवी-
किवीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असते. तसेच त्यामध्ये अ‍ॅक्टिनिडिन हे एन्झाइम असते. जे पचनास मदत करते आणि पोटाच्या समस्या टाळते.

अंजीर-
अंजीरमध्ये फायबर आणि फिसिनसारखे नैसर्गिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पोट स्वच्छ होते.

खजूर-
खजूरमध्ये फायबर आणि नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते.जे आतड्यांच्या हालचालींना चालना देण्यास मदत करू शकते.त्यामुळे पोट साफ होते.

केळी-
केळीमध्ये पेक्टिन असते, जे एक प्रकारचे विरघळणारे फायबर असते. हे सेवन केल्याने आतड्यांच्या हालचाली सुधारण्यास मदत होते.ज्यामुळे शौचास साफ होण्यास मदत होते.

बीन्स-
बीन्समध्ये फायबर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असते. जे पचन सुधारण्यास आणि आतड्यांच्या हालचालींना चालना देण्यास मदत करते. नियमित सेवनाने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews