Home remedies for constipation: बद्धकोष्ठता आजकाल सामान्य समस्या बनली आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बाहेरील पदार्थ, तेलकट पदार्थ यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत आहे. अनेकांना बद्धकोष्ठतेमुळे दिवसभर त्रास सहन करावा लागतो. शौचास साफ न झाल्याने दिवसभर पोट तक्रार करत राहते. त्यामुळे बद्धकोष्ठता नकोशी होते.
अनेकजण बद्धकोष्ठता झाल्यामुळे वेगवेगळी औषधे घेतात. परंतु तरीही त्यांना काहीच फायदा होत नाही. पोट साफ न झाल्याने पोटात दुखणे, पोटफुगी, गॅस ऍसिडिटी यांसारख्या समस्यासुद्धा उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्द्दल सांगणार आहोत. ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम तर मिळेलच शिवाय शौचासही साफ होईल. चला पाहूया हे उपाय नेमके काय आहेत.
कोरफडचा रस-
आयुर्वेदानुसार कोरफड आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. त्यामुळे विविध समस्यांमध्ये कोरफडचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठतेमध्ये शौचास साफ होण्यासाठीसुद्धा कोरफड उपयुक्त ठरते. कोरफडमध्ये लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात. ज्याच्या सेवनाने मल सैल पडते आणि शौचास साफ होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. त्यामुळे दररोज सकाळी कोरफडचा रस पिणे फायदेशीर ठरते.
कोमट पाणी-
बद्धकोष्ठतेमध्ये सर्वात सोपा उपाय म्हणजे पाणी होय. तुम्हाला शौचाला साफ होण्यास त्रास होत असेल तर अशावेळी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. त्यामुळे मल मउ पडते आणि शौचाला साफ होते. शिवाय गरम पाण्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.
फळांच्या स्मूदी-
बद्धकोष्ठतेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या फळांच्या स्मूदी पिऊ शकता. कारण फळांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. आणि फायबर पोटाच्या तक्रारी दूर करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही केळी, अननस, नारळ अशा फळांच्या स्मूदी बनवून पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला शौचासही व्यवस्थित होते.
चिया सीड्सचे पाणी-
बद्धकोष्ठतेमध्ये चिया सीड्सचे पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. कारण चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. आणि फायबर पोटाच्या तक्रारी दूर करण्यात फायदेशीर असते. चिया सीड्समुळे मल मऊ होऊन शौचाला होण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेमध्ये चिया सीड्सचे पाणी अवश्य प्या.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






