मधुमेह आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कढीपत्ता, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत

Published:
कढीपत्त्यामध्ये असे अनेक पोषक तत्वे असतात जी शरीराला अनेक फायदे देतात.
मधुमेह आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कढीपत्ता, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत

Benefits of eating curry leaves on an empty stomach:    भारतीय स्वयंपाकघरामध्ये असे अनेक पदार्थ आहेत, जे अत्यंत औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कढीपत्ता होय. आयुर्वेदानुसार, कढीपत्त्यामध्ये अनेक आजार दूर करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच प्रत्येकाने आपल्या आहारात कढीपत्त्याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. कढीपत्त्यापासून चटणी बनवली जाते. तर अनेकलोक भाज्यांमध्ये, डाळीमध्ये कढीपत्याचा वापर करतात.

 

रिकाम्या पोटी खा कढीपत्ता-

कढीपत्ता केवळ पदार्थांची चव वाढवत नाही. तर कढीपत्ता अनेक आरोग्य फायदेसुद्धा देते. तुम्ही कधी कढीपत्ता रिकाम्या पोटी चावून खाल्ले आहे का? कढीपत्ता रिकाम्या पोटी खाणे फारच गुणकारी असते. त्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आज आपण कढीपत्ता चावून खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत….

 

कढीपत्ता खाण्याचे फायदे-

डोळ्यांसाठी फायदेशीर-
कढीपत्त्यामध्ये अँटी ऑक्सीडेंट आणि व्हिटॅमिन्स ए भरपूर प्रमाणात असते. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फादेशीर आहे. त्यामुळे डोळ्यांच्या अनेकसमस्या दूर होतात. शिवाय डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते.

केसांसाठी फायदेशीर-
कढीपत्ता केस गळणे कमी करते. केसांच्या वाढीस मदत करते. यामध्ये आयर्न, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे केसांच्या योग्य वाढीस मदत होते. त्याच्या सेवनाने केस मजबूत आणि चमकदार बनतात.

पचनक्रिया मजबूत बनते-
कढीपत्त्यामध्ये फायबर आणि अँटी-इंफ्लीमेंट्री गुणधर्म असतात. ज्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच त्याचा सेवनाने आतड्यांचे आरोग्य सुधारते.

वजन कमी करण्यास मदत करते-
वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता हा एक नैसर्गिक उपाय आहे. कारण कढीपत्ता शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवते आणि अतिरिक्त चरबी कमी करते. त्यामुळे वजन वेगाने कमी होणेस मदत होते. शिवाय ते सतत खाण्याची आणि गोड खाण्याची लालसा कमी करते.

मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते-
आयुर्वेदानुसार, कढीपत्त्यामध्ये हायपोग्लायसोमिक गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रॉडक्शन वाढते. याचा डायबिटीस रुग्णांना फायदा होतो. डायबिटीस रुग्णांनी नियमित याचे सेवन केल्यास ग्लुकोज लेव्हल बॅलेन्स राहते.

कढीपत्ता कसा खावा?
जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी ४-५ कढीपत्ता चावून खाऊ शकता किंवा ते पाण्यात उकळून पिऊ शकता. या दोन्ही पद्धती तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. परंतु, जर तुम्हाला आधीच कोणतीही आरोग्य समस्या असेल किंवा तुम्ही कोणतेही औषध घेत असाल तर डॉक्टरांना विचारल्यानंतरच ते तुमच्या आहारात समाविष्ट करा.

 

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)