Marathi News

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आलाय मग बनवा दही भेंडी, वाचा चटपटीत रेसिपी

Published:
तुम्ही कधी ट्राय केलीय का दही भेंडीची रेसिपी. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. शिवाय कमी साहित्यात बनते.
भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आलाय मग बनवा दही भेंडी, वाचा चटपटीत रेसिपी

Dahi bhendi recipe n marathi:  काहींना चिकट गुणधर्मामुळे भेंडी खाणे आवडत नाही. तर काहींना भेंडी प्रचंड आवडते. त्यामुळेच आज आम्ही भेंडीची एक उत्कृष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण दही भेंडी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत. ज्या लोकांना भेंडी आवडत नाही. तेसुद्धा दही भेंडी खाऊन भेंडीच्या प्रेमात पडतील. चला तर मग पाहूया सोपी रेसिपी…

 

दही भेंडीसाठी साहित्य-

 

-२ कप चिरलेली भेंडी

-१ कप  दही

-२ चमचे धणे पावडर

-२ चमचे लाल मिरची पावडर

-१/२ चमचा बेसन

-१ चमचा जिरे

-१ चमचा मोहरी

-१ चमचा बडीशेप

-१/८ चमचा हिंग

-५ ते ७ कढीपत्ता

-१ चमचा तेल

-चवीनुसार मीठ

 

दही भेंडी बनवण्याची रेसिपी-

 

-दही भेंडी बनवण्यासाठी, भेंडी ५ ते ७ मिनिटे मऊ होईपर्यंत वाफवून घ्या. आणि बाजूला ठेवा.

-दही, धणे पूड, मिरची पूड, बेसन आणि मीठ २ टेबलस्पून घेऊन पाण्यात मिसळा.

-नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा आणि त्यात जिरे, मोहरी, बडीशेप, हिंग आणि कढीपत्ता घाला.

-मसाले  तडतडत असताना, दही मिश्रण आणि वाफवलेली भेंडी घाला आणि उकळी आणा. पुन्हा मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे शिजवा.

-कोथिंबीरने सजवलेली दही भेंडी सर्व्ह करा.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews