Plastic surgery 2024: अलीकडच्या काळात प्लास्टिक सर्जरीचा ट्रेंड खूप वाढला आहे. जगाभरात २०२४ मध्ये तब्बल ३ कोटी ८० लाख लोकांनी विविध प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी केल्या आहेत. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जरीच्या अलीकडेच झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
या रिपोर्टनुसार, जवळपास गेल्या ४ वर्षात जगभरात विविध प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या लोकांची संख्या ४२ टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसरीकडे भारतात प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या लोकांची संख्या १४२ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी ही संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे.
प्रमाणित डॉक्टरांकडून करा उपचार-
अलीकडे अनेक लोक विविध प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करत असतात. काही लोक पैसे वाचवण्यासाठी नवख्या डॉक्टरांकडे उपचार प्लस्टिक सर्जरी प्रमाणित डॉक्टरांकडूनच करण्याचा सल्ला दिला जातो.
पुरुषांमध्ये सर्वाधिक आयलिड सर्जरी-
विविध प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करण्यामध्ये पुरुषसुद्धा आता मागे नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे जगभरात सर्वाधिक पुरुषांनी आयलिड सर्जरी केली आहे. २०२४ मध्ये अनेक पुरुषांनी पापण्यांच्या सर्जरी केल्या आहेत. यामध्ये ३० टक्के पुरुषांनी ही सर्जरी केली आहे. त्यामुळे २०२४ मध्ये आयलिड सर्जरी सर्वाधिक करण्यात आली आहे.
ट्रेंडनुसार सर्जरीची मागणी-
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येक गोष्ट ट्रेंडनुसार केली जाते. यामध्ये प्लास्टिक सर्जरीचासुद्धा समावेश आहे. या रिपोर्टनुसार लोक ट्रेंडनुसार प्लास्टिक सर्जरी करण्याची मागणी करत असतात. त्यामुळे ट्रेंड बदलेल तसे प्लास्टिक सर्जरीची मागणीही बदलते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






