Home remedies to control diabetes: आजकाल डायबिटीस हा एक सामान्य आजार बनत आहे. अनेक लोक डायबिटिसच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकांना सकाळी उठल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा अनुभव येतो. रात्री शरीरात ऊर्जा राखण्यासाठी यकृत ग्लुकोज सोडते, ज्यामुळे सकाळी रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते. ही समस्या विशेषतः मधुमेही किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्यांमध्ये सामान्य आहे.
म्हणूनच, रक्तातील साखर नियंत्रित करणे अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी तुमच्या सकाळच्या दिनचर्येत आणि आहारात काही आवश्यक बदल करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळेच आपण जाणून घेऊया सकाळी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते बदल करावेत याबाबत जाणून घेऊया…..
सकाळी उठून पाणी प्या-
रात्री शरीर डिहायड्रेट होते, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. सकाळी उठल्याबरोबर १-२ ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेटेड होते आणि रक्ताभिसरण सुधारते. तुमच्या पाण्यामध्ये चिमूटभर दालचिनी किंवा लिंबू टाकल्याने इन्सुलिनची संवेदनशीलता वाढू शकते.
आयुर्वेदिक ड्रिंक्स-
जर सकाळी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली असेल, तर रिकाम्या पोटी काही ड्रिंक पिणे फायदेशीर ठरू शकते.सकाळी जिरा पाणी पिल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
तसेच सकाळी फायबरने समृद्ध चिया सीड्सचे पाणी पिल्याने ते साखरेचे शोषण कमी करण्यास मदत करते.मेथीमध्ये विरघळणारे फायबर असते, जे कार्बोहायड्रेट्सचे पचन मंदावते.त्यामुळे मेथीचे पाणीसुद्धा फायदेशीर आहे.
नियमित व्यायाम करा-
सकाळी थोडा व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.१५-२० मिनिटे चालणे किंवा हलके स्ट्रेचिंग केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायूंना ग्लुकोजचा चांगला वापर करण्यास मदत होते. योगा आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाऊ नका-
काही पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढवू शकतात आणि त्यामुळे सकाळी ते खाणे टाळावे.पांढरा ब्रेड, साखर, पॅकेज्ड ज्यूस, साखरेचा चहा किंवा कॉफी, बटाटे, केळी, कॉर्नफ्लेक्स इत्यादी पदार्थ टाळा. त्याऐवजी, कडधान्ये, डाळी, ड्रायफ्रूट्स आणि हिरव्या भाज्या खा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






