Breakfast for Diabetes: आजकाल देशात चुकीच्या जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलिकडच्या काळात डायबिटीसने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. डायबिटीस हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीर रक्तातील साखर योग्यरित्या नियंत्रित करू शकत नाही. डायबिटीसवर कायमचा इलाज नाही, परंतु निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून आणि आहारात सुधारणा करून तो नियंत्रित केला जाऊ शकतो.
डायबिटीस नियंत्रित केले नाही तर त्यामुळे शरीरात इतर समस्या देखील उद्भवू शकतात, जसे की दृष्टी कमी होणे, पचन समस्या, जखमा उशिरा बरे होणे, थकवा आणि चिडचिड. या समस्या टाळण्यासाठी, तुमच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करा. आज आपण अशाच काही हेल्दी पदार्थांबाबत जाणून घेऊया…..
चना चाट –
चना चाट हा प्रोटीन आणि फायबरचा एक उत्तम स्रोत आहे. आणि नाश्त्यात त्याचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चण्यामध्ये प्रथिने जास्त असतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. फायबरचे प्रमाण पचन सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. चण्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. ज्यामुळे ते डायबिटीससाठी चांगले असते.
अंडी –
डायबिटीसच्या रुग्णांनी त्यांच्या नाश्त्यात अंडी समाविष्ट करावीत. अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे आणि त्यांचा आहारात अनेक प्रकारे समावेश करता येतो. अंडी प्रोटीनसमृद्ध असतात, ज्यामुळे स्नायू दुरुस्त होण्यास मदत होते. व्हिटॅमिन डी, बी६, बी१२ आणि विविध खनिजे असतात. तसेच अंड्यांमध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
नाचणीचा डोसा –
कॅल्शियम, फायबर आणि प्रथिनेसमृद्ध नाचणीचा डोसा हा डायबिटीससाठी एक चांगला नाश्ता आहे. नाचणीपासून बनवलेला डोसा स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो आणि घरी सहज तयार करता येतो. नाचणी खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत होते.
शेवग्याची भाकरी- –
शेवग्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. शेवग्याची भाकरी बनवण्यासाठी, तुम्हीशेवग्याची ताजी पाने बारीक करून पीठात मिसळू शकता. जर तुमच्याकडे पाने नसतील तर तुम्ही मोरिंगा पावडर पिठामध्ये मिसळून भाकरी बनवू शकता. व्हिटॅमिन ए, सी आणि ई, तसेच कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोहाने समृद्ध असलेल्या शेवग्याची पाने मधुमेहींसाठी फायदेशीर आहेत. नाश्त्यात शेवग्याची भाकरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






