डायबिटीसच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नयेत ‘हे’ ५ पदार्थ, वेगाने वाढते शुगर लेव्हल

Published:
दररोजच्या आहारात असणारे काही पदार्थ रक्तातील साखर वाढवतात त्यामुळे त्यांचा मर्यादित सेवन करणे आवश्यक आहे.
डायबिटीसच्या रुग्णांनी अजिबात खाऊ नयेत ‘हे’ ५ पदार्थ, वेगाने वाढते शुगर लेव्हल

Which foods to avoid in diabetes:   आजकाल डायबिटीस हा एक सामान्य आजार बनत चालला आहे. या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य डाएट प्लॅन तयार करणे महत्वाचे आहे. हा डाएट प्लॅन विशेषतः साखर आणि इतर गोड पदार्थ टाळण्यावर लक्ष केंद्रित करतो. तसेच रक्तातील साखर वेगाने वाढवू शकणारे पदार्थ टाळण्यावरही भर देतो.त्यामुळेच आज आपण असे काही पदार्थ जाणून घेऊया जे खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते. चला पाहूया हे पदार्थ नेमके कोणते आहेत…..

बटाटे-
बटाटे, कॉर्न आणि रताळे यासारख्या काही भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. जे शरीरात लवकर ग्लुकोजमध्ये रूपांतरित होऊ शकते. बटाट्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो. ज्यामुळे रक्तातील साखरेमध्ये जलद वाढ होऊ शकते.

मसालेदार भाज्या-
मसालेदार भाज्या या बहुतेकदा जास्त तेल, क्रीम किंवा इतर अनेक घटक मिसळून बनवलेले असतात. ज्यामध्ये कॅलरीज आणि अनहेल्दी फॅट्सदेखील जास्त असतात. या गोष्टी फक्त वजन वाढण्यास हातभार लावत नाहीत तर इन्सुलिनवर देखील परिणाम करू शकतात. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या पालक, मेथी, ब्रोकोली, कोबी, कोबी, दुधी भोपळा आणि काकडी यासारख्या कमी स्टार्च असलेल्या भाज्यांना प्राधान्य द्यावे.

गोड फळे-
फळे ही आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा चांगला स्रोत असली तरी, मधुमेहींनी सरसकट सर्व फळे खाणे टाळावीत. आंबा, केळी, लीची, सपोटा आणि द्राक्षे यासारख्या काही फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. या फळांचे जास्त सेवन केल्याने रक्तातील साखर वाढू शकते. फळांचे रस देखील फायबर काढून टाकतात आणि गोडवा वाढवतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते.

पांढरा भात-
भारतीय घरांमध्ये पांढरा भात हा एक प्रमुख पदार्थ आहे. परंतु मधुमेहींसाठी तो सर्वात हानिकारक पदार्थांपैकी एक असू शकतो. पांढऱ्या भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो.म्हणजेच तो खूप लवकर पचतो आणि रक्तातील साखरेची पातळी त्वरित वाढवतो.

फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ-
आजच्या बदलेल्या जीवनशैलीत फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हे सामान्य पर्याय बनले आहेत. परंतु मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते अत्यंत धोकादायक ठरू शकतात. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, चिप्स आणि पॅकेज्ड कुकीज यांसारखे पदार्थ, रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, उच्च सोडियम यासारखे पदार्थ टाळावेत.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews