डायबिटीस रुग्णांनी नाश्त्यात आवर्जून प्या ‘हे’ ४ ड्रिंक, रक्तातील साखर राहील नियंत्रित

Published:
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी, मधुमेही रुग्णांनी सकाळी निरोगी ड्रिंक्स पिऊन आपल्या दिवसाची सुरुवात करावी.
डायबिटीस रुग्णांनी नाश्त्यात आवर्जून प्या ‘हे’ ४ ड्रिंक, रक्तातील साखर राहील नियंत्रित

Tips for keeping blood sugar under control:   काही वर्षांपूर्वी डायबिटीसची समस्या मोजक्या लोकांपुरती मर्यादित होती. परंतु, आज डायबिटीस रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणूनच, तज्ज्ञ मधुमेह टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली स्वीकारण्याची आणि आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. बरेच लोक त्यांचा संपूर्ण दिवस डेस्कवर बसून घालवतात. यामुळे लठ्ठपणा येतो, जो मधुमेहासारख्या आरोग्य समस्यांचे एक प्रमुख कारण आहे

त्यामुळेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी, मधुमेही रुग्णांनी सकाळी निरोगी ड्रिंक्स पिऊन आपल्या दिवसाची सुरुवात करावी. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ड्रिंक्सबाबत सांगणार आहोत जे नाश्त्यात पिल्याने शुगर कंट्रोल राहण्यास मदत होते…..

भाज्यांचा रस-
भाज्यांचा रस मधुमेही रुग्णांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्या, काकडी इत्यादींचा वापर करू शकता. त्यामुळे रक्तातील साखर वाढण्यापासून रोखते.परंतु रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकणाऱ्या भाज्यांचा रस अजिबात पिऊ नका.

लिंबू पाणी-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर न घालता फक्त लिंबू पाणी पिणेदेखील एक चांगला पर्याय आहे. हे पेय, विशेषतः उन्हाळ्यात, शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. फक्त लिंबू, थोडेसे मीठ आणि पाणी मिसळा आणि ते प्या. जर तुम्हाला गोड लिंबू पाणी हवे असेल तर तुम्ही त्यात स्टीव्हिया घालू शकता. पण साखर घालणे टाळा.

हर्बल टी-
हर्बल टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवसाची सुरुवात करण्यासाठी ते एक चांगले पेय मानले जाते. हर्बल टीमध्ये आले, जास्वंद आणि कॅमोमाइल टी असे अनेक चांगले पर्यायआहेत. हर्बल टी फक्त कार्ब-, कॅलरी- आणि शुगर फ्री नसतात, तर त्यात अँटीऑक्सिडंटदेखील असतात.

शुगर फ्री कॉफी-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर न घालता कॉफी पिणे खूप फायदेशीर आहे. तज्ञांचा असा दावा आहे की नियमितपणे शुगर फ्री कॉफी पिल्याने टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. मधुमेह असलेले लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात शुगर फ्री कॉफीने करू शकतात. यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यास मदत होईल. पण कॉफीमध्ये साखर, दूध किंवा फ्लेवर्ड सिरप घातल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका वाढू शकतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews