Marathi News

डायबिटीसच्या रुग्णांनी रोज सकाळी प्या ‘हे’ ड्रिंक्स, दिवसभर रक्तातील साखर राहील नियंत्रित

Published:
काही ड्रिंक्स दररोज सकाळी सेवन केले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि इतर अनेक आरोग्य समस्यादेखील दूर होतात.
डायबिटीसच्या रुग्णांनी रोज सकाळी प्या ‘हे’ ड्रिंक्स, दिवसभर रक्तातील साखर राहील नियंत्रित

Home Remedies to Control Blood Sugar:   आजकाल डायबिटीस हा एक सामान्य आजार बनत चालला आहे. बदलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डायबिटीसचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत रक्तातील साखर नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अशात काही घरगुती ड्रिंक्स रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

जर हे ड्रिंक्स दररोज सकाळी सेवन केले तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि इतर अनेक आरोग्य फायदे देखील दूर होतात. चला अशा पाच ड्रिंक्सबद्दल जाणून घेऊया जे साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकतात.

दालचिनीचे पाणी-
दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यातील घटक इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात आणि पेशींना ग्लुकोजचा चांगला वापर करण्यास मदत करतात. एक कप पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला आणि ते उकळवा. ते गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी कोमट करून प्या. यामुळे चयापचय सक्रिय होण्यास मदत होते.

कारल्याचा रस-
कारल्याचा रस चवीला कडू असू शकतो. पण मधुमेहींसाठी तो वरदान आहे. त्यात कॅरॅन्टीन आणि पॉलीपेप्टाइड-पी सारखे संयुगे असतात. जे नैसर्गिक इन्सुलिन म्हणून काम करतात आणि रक्तातील साखर कमी करतात. यासाठी ताज्या कारल्याचा रस घ्या. अर्धा कप रसात थोडे पाणी आणि लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. चव सुधारण्यासाठी थोडासा सफरचंद किंवा काकडीचा रस देखील घालता येतो.

आवळ्याचा रस-
आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ते निरोगी स्वादुपिंड राखण्यास मदत करते आणि इन्सुलिन स्राव वाढवते. आवळ्यामध्ये क्रोमियम देखील असते. जे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिज्मसाठी फायदेशीर आहे. ताज्या आवळ्याचा रस काढा आणि त्याचे दोन चमचे एका ग्लास पाण्यात मिसळा. तुम्ही चवीनुसार थोडे काळे मीठ घालू शकता.

ग्रीन टी-
ग्रीन टी फक्त वजन कमी करण्यास मदत करत नाही तर टाइप २ मधुमेहाचा धोका कमी करण्यास देखील मदत करते. त्यात असलेले पॉलीफेनॉल, अँटीऑक्सिडंट्स, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करतात. एक कप गरम पाण्यात एक चमचा ग्रीन टीची पाने घाला आणि २-३ मिनिटे भिजवा. सकाळी नाश्त्यापूर्वी साखरेशिवाय गाळून घ्या आणि प्या.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews