डायबिटीस रुग्णांनी दररोज खा ‘या’ ५ भाज्या, रक्तातील साखर राहील नियंत्रित

Published:
रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी विशिष्ट हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करता येतो.
डायबिटीस रुग्णांनी दररोज खा ‘या’ ५ भाज्या, रक्तातील साखर राहील नियंत्रित

Which vegetables to eat if you have diabetes:   आजकाल बहुतेक लोकांना डायबिटीसची समस्या आहे. यामुळे तहान वाढणे, वारंवार लघवी होणे, थकवा येणे, दृष्टी अंधुक होणे, भूक वाढणे, अचानक वजन कमी होणे, हातपायांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न होणे, चक्कर येणे आणि चिडचिड होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

अशा परिस्थितीत, लोक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकदा विविध उपायांचा अवलंब करतात.सोबतच लोकांना निरोगी आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करता येतो. आज आपण रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी कोणत्या हिरव्या भाज्या खाव्यात ते जाणून घेऊया…..

गवारी-
गवारीमध्ये विरघळणारे फायबर असते. ते तुमच्या आहारात समाविष्ट केल्याने शरीरात कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होण्यास मदत होते.ज्यामुळे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

ढोबळी मिरची –
ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे शरीराला अँटीऑक्सिडंट्स प्रदान करते. ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते आणि इन्सुलिनची प्रभावीता वाढवते. लाल, पिवळी आणि हिरवी ढोबळी मिरची मधुमेहींसाठी विविध पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.

पडवळ-
पडवळ ही हिरवी भाजी ट्रायकोसॅन्थिन, क्युकरबिटासिन आणि ल्युपिओल यासारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तुमच्या आहारात पडवळचा समावेश केल्याने इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि ग्लुकोजच्या वाढीस प्रतिबंध होते. जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत.

कारले-
रक्तातील साखर वाढण्याच्या समस्यांसाठी कारले फायदेशीर मानले जाते. कारल्यात कॅरॅन्टीन आणि पॉलीपेप्टाइड-पी असते. कारल्यात शरीरात नैसर्गिक इन्सुलिन म्हणून काम करते. ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

तोंडली-
तोंडलीच्या भाजीमध्ये क्युकरबिटासिन बी आणि टेरपेनॉइड्स सारखे संयुगे असतात. जे शरीराच्या इन्सुलिनची पातळी नियंत्रित करतात. ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते आणि इतर अनेक आरोग्य फायदे मिळतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews