Marathi News

Diwali Recipes: यंदा दिवाळी फराळात तुम्हीही हटके काहीतरी करायचा विचार करताय? ट्राय करा नारळाचे लाडू

Published:
यंदा दिवाळीला तुम्हीही हटके काहीतरी करायचा विचार करत असाल तर नारळाचे लाडू ट्राय करू शकता.
Diwali Recipes: यंदा दिवाळी फराळात तुम्हीही हटके काहीतरी करायचा विचार करताय? ट्राय करा नारळाचे लाडू

Coconut laddu recipe:   दिवाळीच्या सणाला फराळाचं विशेष महत्व आहे. आता घराघरात महिलांमध्ये फराळ बनवण्याची घाई दिसून येत आहे. फराळामध्ये लाडूपासून ते चिवड्यापर्यंत अनेक पदार्थ बनवले जातात. यामध्ये अनेकांना पारंपरिक पदार्थच खायला आवडतात. परंतु आजकाल अनेकजण फराळामध्ये नवनवीन पदार्थ ट्राय करत आहेत. यंदा तुम्हीही हटके नारळाचे लाडू ट्राय करू शकता.

नारळाचे लाडू चवीला खूप छान लागतात. दिवाळीच्या फराळासोबतच उपवासाच्या वेळीही ते खाऊ शकता. बाजारातील गोड पदार्थांऐवजी घरी काहीतरी चांगले खायचे असेल तर नारळाचे लाडू हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

नारळाचे लाडू बनवण्यासाठी मावा किंवा दुधाच्या पावडरसह किसलेले नारळ वापरले जाते. हा गोड पदार्थ बनवायला खूप सोपा आहे. यासोबतच, घरी बनवल्याने पूर्णपणे भेसळमुक्त आणि चांगले असते.

 

नारळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

१ कप नारळाची पावडर
१ ग्लास दूध
१/२ कप साखर
५० ग्रॅम दूध पावडर

 

नारळाचे लाडू बनवण्याची रेसिपी-

 

सर्वप्रथम, गॅसवर एक कढई ठेवा, त्यात एक मोठा चमचा तूप घाला, त्यात नारळ पावडर घाला आणि ते सोनेरी होईपर्यंत आणि सुगंध वास येईपर्यंत परतून घ्या.

आता त्याचे एकजीव मिश्रण तयार होईपर्यंत दूध घालत रहा.

आता साखर घाला आणि ते देखील चांगले शिजू द्या.

यानंतर दुधाची पावडर घाला. आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत चमच्याने ढवळत रहा.

आता ते मिश्रण एका प्लेटमध्ये काढा

थोडे थंड होऊ द्या. मिश्रण कोमट असतानाच लाडू बनवा.

आता एका प्लेटमध्ये नारळ पावडर घ्या आणि त्यात लाडू घाला आणि नारळाचा थर द्या. तयार आहेत नारळाचे चविष्ट लाडू.

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews