Remedies to relieve fatigue: दिवसभराच्या काबाडकष्टनंतर थकवा जाणवणे अगदी सामान्य आहे. परंतु, जर काही न करताही सतत थकवा जाणवत असेल तर ते चिंतेचे कारण असू शकते. शरीरात पौष्टिकतेची कमतरता, निर्जलीकरण, खराब आहार, झोपेची कमतरता, ताणतणाव किंवा आजारपणामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. सततचा थकवा हळूहळू शरीराला कमकुवत करतो.
कधीकधी, इतका अशक्तपणा येतो की दैनंदिन कामे देखील कठीण होतात. थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी, लोक औषधे घेतात. परंतु त्याऐवजी तुम्ही काही साध्यासोप्या टिप्स फोलो केल्यास थकवा दूर होऊन ऊर्जा मिळण्यास मदत होईल. जाणून घेऊया या टिप्स कोणत्या आहेत…..
पौष्टिक आहार-
तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर पौष्टिक आहार घ्या. बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे, सोडियम, लोह आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि थकवा दूर होण्यास मदत होईल.
भरपूर पाणी प्या-
पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणादेखील येऊ शकतो. हे टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. डॉक्टर दिवसातून २ ते ३ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही फळांचा रस, ताक, लस्सी, लिंबूपाणी आणि नारळ पाणी देखील घेऊ शकता. पुरेसे द्रवपदार्थ सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटेल.
व्यायाम करा-
दररोज व्यायाम केल्याने थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही दररोज १५ ते ३० मिनिटे व्यायाम, योगा, सायकलिंग, जॉगिंग किंवा इतर कोणतीही शारीरिक हालचाल करू शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळतेच, शिवाय ताण कमी होतो आणि फ्रेश वाटते.
खजूर खा-
थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी खजूर खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामध्ये प्रथिने, लोह, मॅग्नेशियम आणि तांबे यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. जे शरीर निरोगी राखण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा कमी होतो.
झोपसुद्धा महत्वाची आहे-
जर आपल्याला पुरेशी झोप मिळाली नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. आपले मन आणि शरीर रिचार्ज करण्यासाठी, आपण रात्री किमान ७ ते ८ तास झोप घेतली पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने दिवसभर थकवा येतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






