मुलांच्या पोटात सतत जंत होतात? ‘हे’ घरगुती उपाय दूर करतील समस्या

Published:
मुलांना जंतांच्या समस्येपासून वाचवण्यासाठी, पालकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांच्या पोटात सतत जंत होतात? ‘हे’ घरगुती उपाय दूर करतील समस्या

What to do if children have intestinal worms:   मुलांना बऱ्याचदा आपल्या आरोग्याबाबत अनेक गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे ते नकळत अनेक चुका करतात ज्यामुळे त्यांच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे, हात न धुता अन्न खाल्ल्याने पोटात जंत होऊ शकतात. या काळात मुलांचे वजन कमी होऊ शकते.

तसेच काही मुलांना जेवण जात नाही. मुलांना या समस्येपासून वाचवण्यासाठी, पालकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अनेक घरगुती उपाय करता येतात. मुलांच्या पोटातील जंत कसे दूर करायचे याबाबत आपण जाणून घेऊया….

हळद-
आयुर्वेदानुसार हळद ही एक जंतनाशक आहे. असे मानले जाते की बाळाच्या दुधात हळद पावडर टाकल्याने जंत बाहेर पडतात. हळदीच्या वापराने पोटाच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते.

कारले-
कारल्याच्या बिया, पाने आणि फळांच्या अर्कामध्ये जंतनाशक गुणधर्म असतात. असे मानले जाते की बाळाला कारल्याचा रस दिल्याने पोटातील जंत मारण्यास मदत होते. त्यामुळे पोट स्वच्छ होऊन विषारी घटक बाहेर पडतात.

लसूण-
लसूण खाल्ल्याने पोटातील जंत मारण्यास मदत होऊ शकते. परंतु लसूण रक्तदाबाचा धोका वाढवू शकतो. म्हणून हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

ओवा-
ओव्यामध्ये जंतनाशक गुणधर्म असतात. ओव्यामध्ये तपकिरी तेल असते, जे प्रामुख्याने थायमॉल असते. हे आतड्यांतील जंत बाहेर काढण्यास मदत करू शकते.शिवाय पोटाच्या इतर समस्याही दूर होतात.

निरोगी आहार-
संतुलित आणि पौष्टिक आहार मुलाच्या रोगप्रतिकारक शक्तीला आधार देतो. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती मुलाच्या संसर्गाचा धोका कमी करते. यासाठी, तुम्ही तुमच्या मुलाच्या आहारात फळे, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करू शकता.

मुलाला अनवाणी पायाने बाहेर जाऊ देऊ नका-
जेव्हा एखादे मूल अस्वच्छ ठिकाणी अनवाणी चालते तेव्हा ते कीटकांच्या संपर्कात येऊ शकतात. म्हणून, बाहेर खेळताना तुमचे मूल बूट किंवा चप्पल घातले आहे का बघा. अशाने मुलांना जंतूंच्या संपर्कापासून वाचवता येते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews