Remedies to improve children’s memory: आजकाल मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. कारण सध्याच्या काळात सोशल मीडिया आणि मोबाईलमुळे मुलांचे लक्ष अभ्यासावर कमी असते, ज्यामुळे त्यांच्या विकासारही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत मुलांचा तसेच पालकांचाही ताण वाढतो.
तुमच्याही मुलाला अभ्यासात रस नसेल किंवा केलेला अभ्यास लक्षात राहात नसेल, तर आहारात बदल करणे आवश्यक आहे. असे काही पदार्थ आहेत जे मुलांच्या आहारात समाविष्ट केल्यास मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण होऊ शकते.आज आपण या पदार्थांबद्दल जाणून घेऊया…..
हे ही वाचा
अंडी-
अनेकजण आहारात अंडी सामील करण्याचा सल्ला देतात. अंडी अनेक गोष्टींमध्ये फायदेशीर आहे. प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी१२ आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले अंडे मेंदूच्या विकासास आणि स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी मदत करतात.
अक्रोड-
मुलांची स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी, त्यांना दररोज भिजवलेले अक्रोड खायला द्या. बदामांप्रमाणेच अक्रोडमध्येही फायटिक अॅसिड असते, म्हणून अक्रोड खाण्यापूर्वी भिजवावे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मेंदूचे कार्य वाढवण्यास मदत करणारे इतर पोषक घटक असतात. अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी६ देखील असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
बदाम-
दररोज सकाळी मुलांना भिजवलेले बदाम खायला द्या. पाच बदाम रात्रभर पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते सोलून तुमच्या मुलाला खायला द्या. बदामांमध्ये फायटिक अॅसिड असते. जे शरीरातील इतर आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वांचे शोषण कमी करू शकते. म्हणून, भिजवलेले बदाम जास्त फायदे देऊ शकतात. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि बी जीवनसत्त्वे असतात, तसेच कॅल्शियम, लोह आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतात, जे मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात.
बिया-
मुलांना निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, त्यांना दररोज मिक्स बिया खायला द्या. सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स आणि अळशीच्या बिया मेंदूला ऊर्जा देतात तसेच स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारतात.
दूध-
दुधात कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी असते. जे मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. तुमच्या मुलाला गाईचे दूध द्या. गाईचे दूध शरीरासाठी एक नैसर्गिक औषध आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)