कॅन्सर-डायबिटीससारखे आजार दूर ठेवते ड्रॅगन फ्रुट, जाणून घ्या सेवन करण्याचे फायदे

Published:
ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात.
कॅन्सर-डायबिटीससारखे आजार दूर ठेवते ड्रॅगन फ्रुट, जाणून घ्या सेवन करण्याचे फायदे

Benefits of Dragon Fruit:   ड्रॅगन फ्रूट,फक्त त्याच्या सुंदर रंग आणि चवीसाठीच ओळखले जात नाही, तर ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे कमी कॅलरीज असलेले फळ आहे जे पोषक तत्वांनी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे.

त्यात फायबर, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. त्यामुळे त्याला एक सुपरफूड म्हटले जाते. आज आपण ड्रॅगन फ्रुट खाण्याचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे जाणून घेऊया….

वजन कमी करण्यास फायदेशीर-
ड्रॅगन फ्रुटमध्ये कमी कॅलरी आणि उच्च फायबर असते. त्यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे तुमची भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.

त्वचा चमकदार बनते-
ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स निरोगी आणि चमकदार त्वचा राखण्यास मदत करतात. ते सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास देखील मदत करते.

डायबिटीसमध्ये उपयुक्त-
ड्रॅगन फ्रुटचा कमी ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्यापासून रोखतो.ज्यामुळे ते मधुमेहींसाठी फायदेशीर ठरते.

हृदयाचे आरोग्य सुधारते-
ड्रॅगन फ्रूटमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. जे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.

कॅन्सरपासून बचाव करते-
ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास आणि कॅन्सरच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करण्यास मदत करतात.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते-
ड्रॅगन फ्रूटमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि सर्दी आणि फ्लूसारख्या समस्या टाळण्यास मदत करतात. त्यामुळे हे फळ खाल्ल्यास हंगामी आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते.

हाडे मजबूत करते-
ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. जे हाडे मजबूत करते आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या समस्या टाळते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)