Marathi News

रोज सकाळी प्या ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक, लिव्हरपासून ते त्वचेपर्यंत मिळतील फायदेच-फायदे

Published:
डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील साचलेली घाण काढून टाकण्यास आणि आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
रोज सकाळी प्या ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक, लिव्हरपासून ते त्वचेपर्यंत मिळतील फायदेच-फायदे

Which detox drinks to drink daily:   प्रदूषणामुळे आपल्या श्वासोच्छवासाद्वारे प्रदूषित हवा आपल्या शरीरात प्रवेश करते. जी केवळ यकृतालाच नव्हे तर शरीराच्या इतर अवयवांनाही प्रभावित करते. प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे रक्षण करण्यासाठी अनेकजण विविध डिटॉक्स ड्रिंक्स घेतात.

डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातील साचलेली घाण काढून टाकण्यास आणि आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहित आहे का की रिकाम्या पोटी डिटॉक्स ड्रिंक्स घेतल्याने शरीरात पोषक तत्वांचे शोषण वाढते. आज आपण सकाळी रिकाम्या पोटी काही डिटॉक्स ड्रिंक्स पिण्याचे फायदे जाणून घेऊया……

पुदिना आणि कोथिंबीर-
दररोज स्वयंपाकात वापरले जाणारे पुदिना आणि कोथिंबीर दोन्ही वनस्पती अपचन, पोटफुगी आणि गॅस कमी करण्यास मदत करतात. हा रस नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतो. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. पुदिना तुमचे श्वसनमार्ग साफ करण्यास मदत करतो. आणि त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे तोंडाचे आरोग्य सुधारतात. या रसात जीवनसत्त्वे ए, के आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. यातील गुणधर्म त्वचासुद्धा साफ आणि नितळ बनवतात.

दुधी भोपळ्याचा रस-
दुधी भोपळ्याचा रस नैसर्गिक मूत्रवर्धक म्हणून काम करतो. शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढतो. हा रस शरीरातील उष्णता कमी करतो आणि पचनसंस्थेला शांत करतो.ज्यामुळे तो उष्ण हवामानासाठी एक उत्तम पर्याय बनतो. ते पिण्याने शरीराचे पीएच संतुलित होते आणि पचनक्रिया सुधारते. दुधीचा रस तहान कमी करतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यात पाणी भरपूर असल्याने दुधीचा रस तुमच्या शरीराला हायड्रेट करतो. ज्यामुळे त्वचा चमकदार होते.

गाजर आणि आवळा रस-
गाजर, बीट आणि आवळा रस हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. ज्यामध्ये बीटा-कॅरोटीन, नायट्रेट्स आणि इतर अँटीऑक्सिडंट्स असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. बीट रक्त प्रवाह सुधारण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी ओळखले जाते. तर गाजर डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. बीटमधील नैसर्गिक साखर आणि लोह ते उर्जेचा नैसर्गिक स्रोत बनवते. हा रस यकृत स्वच्छ करतो, शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन मदत करतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews