केवळ झोपण्याच्या पद्धतीमुळे नाही तर…, दिवसभरातील अशा चुका ज्यामुळे तुमचा पाठीचा कणा होतोय खिळखिळा!

Written by:Smita Gangurde
Published:
शेवटी नेक हंपची समस्या फक्त उशीमुळे नाही तर रोजच्या बसण्या आणि उठल्याच्या चुकीच्या सवयींमुळे होते.
केवळ झोपण्याच्या पद्धतीमुळे नाही तर…, दिवसभरातील अशा चुका ज्यामुळे तुमचा पाठीचा कणा होतोय खिळखिळा!

आजकाल अनेक जणांची मान आणि पाठीचा वरचा भाग काहीसा फुगलेला दिसू लागला आहे. त्याला ‘नेक हंप’ किंवा मानेवरील फुगवटा असं म्हटलं जातं. यामागे उशी हे कारण असल्याचा बऱ्याच जणांचा अंदाज आहे. मात्र हे खरं नाही. रात्री झोपताना घेतली जाणारी उशी हा त्यातील एक भाग आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.

नेक हंप वाढण्याची भीती…

खरी समस्या आपल्या दैनंदिन जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे आहे. मोबाइल, लॅपटॉप किंवा डेस्कवर तासन्-तास पुढे वाकून काम करणं, फोनला डोळ्यांजवळ उचलून पाहणं — या साऱ्या हालचालींमुळे आपल्या मणक्याच्या हाडांच्या नैसर्गिक वक्रतेत बदल येतो आणि स्नायूंवर अनावश्यक ताण वाढतो. सतत मान पुढे करून काम केल्याने पाठीच्या कण्यावर अतिरिक्त दबाव येतो आणि यामुळे हळूहळू नेक हंप वाढू शकतो. यामध्ये फक्त उशी बदलणे किंवा किंमत जास्त असलेली ऑर्थोपेडिक उशी वापरणे पुरेसे ठरत नाही. आपल्याला दिवसभरातील अनेक छोटी-मोठ्या चुका थांबवाव्या लागतील आणि चांगल्या सवयींचा अवलंब करावा लागेल.

हे करा बदल…

उदा. – मोबाइल स्क्रीन डोळ्यांच्या सरळ रेषेत ठेवा.
दर ३० ते ४५ मिनिटांनी जागेवरुन उठून स्ट्रेचिग करावी.
खांदा आणि पाठ मजबूत राहावेत यासाठी नियमित यासंबंधित व्यायाम करा.

त्याचबरोबर, जर मान किंवा कूबड वाढत असेल किंवा सतत दुखत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणं गरजेचं आहे. शेवटी नेक हंपची समस्या फक्त उशीमुळे नाही तर रोजच्या बसण्या आणि उठल्याच्या चुकीच्या सवयींमुळे होते.

 

 

Follow Us :GoogleNews