लॅपटॉप-मोबाईलमुळे डोळे कोरडे होऊन खाज सुटतेय? मग करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Published:
डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो.
लॅपटॉप-मोबाईलमुळे डोळे कोरडे होऊन खाज सुटतेय? मग करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Remedies for itchy eyes:   आजकाल बहुतांश लोक लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीन वापरण्यात तासनतास घालवतात. जास्त वेळ स्क्रीनवर बसल्याने अनेकांना डोळे कोरडे होण्याचा त्रास होतो. यामुळे डोळ्यांची जळजळ, खाज सुटणे, कोरडेपणा, जडपणा, प्रकाश संवेदनशीलता आणि डोळ्यांना अंधुक दिसण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

अशा परिस्थितीत, या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळेच आपण जाणून घेऊया की, डोळ्यांचा कोरडेपणा आणि खाज कमी करण्यासाठी कोणत्या वनस्पतींचा वापर करायचा……

ब्राह्मी-
ब्राह्मी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. तसेच अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म देखील आहेत. याचा वापर केल्याने कोरडेपणा आणि लालसरपणा कमी होतो, डोळ्यांचा ताण कमी होतो, डोळ्यांची जळजळ कमी होते आणि डोळ्यांमध्ये पाणी तयार होऊन कोरड्या डोळ्यांची समस्या दूर होते.

द्राक्षे
आयुर्वेदानुसार, द्राक्षांमध्ये हायड्रेटिंग आणि अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म असतात. तसेच जीवनसत्त्वे एआणि के सारखे पोषक घटक असतात. त्यांचा वापर केल्याने डोळ्यांची सूज, कोरडेपणा आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

त्रिफळा-
आयुर्वेदिक औषधी वनस्पतींपासून बनवलेली त्रिफळा ही औषधी पावडर डोळ्यांसाठी वापरली जाऊ शकते. त्रिफळामध्ये अँटी इन्फ्लीमेंट्री गुणधर्म आहेत. त्रिफळाच्या पाण्याने डोळे धुण्याने डोळ्यांची सूज आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते, डोळ्यांची जळजळ, खाज कमी होते आणि डोळ्यात ओलावा निर्माण होण्यास मदत होते. तसेच डोळ्यांना नैसर्गिकरित्या घाण काढून टाकण्यास देखील मदत होते.

बडीशेप-
बडीशेपला गोड चव आणि थंडावा असतो. बडीशेपमधील नैसर्गिक संयुगे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. बडीशेप डोळ्यांचा थकवा दूर करते आणि जास्त काळ दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते. ते पचन देखील सुधारते, ज्याचा अप्रत्यक्षपणे डोळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)