थंडीमुळे डोळ्यांखाली सूज येऊन डोळे विचित्र दिसतात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

Published:
थंडीत कधीकधी डोळ्यांवर सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. त्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर असतात.
थंडीमुळे डोळ्यांखाली सूज येऊन डोळे विचित्र दिसतात? मग करा ‘हे’ घरगुती उपाय

Home remedies to reduce eye swelling:   हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात. बहुतेक लोक अशा समस्यांसाठी औषधे घेण्यास टाळाटाळ करतात. हिवाळ्यात बऱ्याचदा डोळ्यांखाली सूज येण्याची समस्या उद्भवते. जी खूप वाईट दिसते. अशा परिस्थितीत डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करून पाहता येतील.

या घरगुती उपायांचा वापर केल्याने डोळ्यांची सूज तर दूर होईलच पण डोळ्यांचा थकवाही कमी होईल. कधीकधी डोळ्यांवर सूज येण्याची समस्या खूप थंडी, उशिरा झोपणे आणि जास्त जंक फूड खाल्ल्याने देखील होऊ शकते. आज आपण हिवाळ्यात डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया…..

बटाटा-
बटाट्यामुळे डोळ्यांभोवतीची सूज कमी होण्यास मदत होते. बटाट्याचे तुकडे कापून डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज आणि संसर्ग कमी होण्यास मदत होते. बटाटा लावल्याने डोळ्यांना आराम मिळतो आणि हिवाळ्यात सूज कमी होते.

काकडी-
काकडी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. डोळ्यांना लावल्याने डोळ्यांना आराम मिळतो आणि सूज कमी होते. काकडीचे लहान तुकडे करा आणि १० मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. नंतर, काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल.

कॉफी पावडर-
कॉफी पावडर डोळ्यांभोवतीची सूज कमी करण्यास मदत करते. यासाठी, अर्धा चमचा कॉफी पावडर किंचित कोमट खोबरेल तेलात मिसळा. हे मिश्रण डोळ्यांभोवती ५ मिनिटे लावा. नंतर, सामान्य पाण्याने डोळे धुवा. यामुळे सूज दूर होईल.

खोबरेल तेल-
खोबरेल तेल हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेलात असलेले अँटी इन्फ्लीमेंट्री आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म सूज आणि संसर्ग कमी करण्यास मदत करतात. खोबरेल तेल वापरण्यासाठी, बोटांवर थोडेसे खोबरेल तेल घेऊन डोळ्यांभोवती हलक्या हाताने मालिश करा. यामुळे केवळ सूज कमी होणार नाही तर तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews