Ayurvedic remedies to improve eyesight: शरीराच्या प्रत्येक अवयवापैकी डोळे हे सर्वात जास्त संवेदनशील आणि खूप महत्वाचे आहेत. पण अनेकदा डोळ्यांना थोडीशी धूळदेखील सहन होत नाही. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या सर्वांनाच त्रासदायक असते. कारण त्यांच्याशिवाय कोणतेही काम करणे कठीण होऊ शकते. लहानपणापासूनच मुलांच्या आहारात निरोगी पदार्थांचा समावेश केला जातो जेणेकरून त्यांची दृष्टी सुधारेल आणि त्यांना निरोगी ठेवता येईल.
तसेच अनेक पालक डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विविध घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय देखील वापरून पाहतात. त्यामुळेच आपण अशा काही टिप्स जाणून घेऊया ज्या दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकतात…..
गायीचे तूप-
डोळ्यांना किंवा नाकाला तूप लावणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तूप डोळ्यांचे हायड्रेशन राखण्यास आणि डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करू शकते. म्हणून, डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी नेहमी शुद्ध गायीचे तूप वापरा.
अंजन-
आयुर्वेदात, अंजन म्हणेजच काजळ फायदेशीर मानले जाते. अंजनलावल्याने डोळे स्वच्छ होतात. याचा वापर दृष्टी सुधारतो आणि डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करू शकतो.
डोळ्यांचे व्यायाम-
डोळ्यांना आराम देण्यासाठी तुम्ही डोळ्यांचे व्यायाम करू शकता. यामध्ये बाजूला, वर आणि खाली पाहणे आणि दररोज १० मिनिटे डोळे घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट दिशेने फिरवणे समाविष्ट आहे. असे केल्याने डोळे निरोगी होतात. आणि डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात.
त्रिफळा-
आयुर्वेदानुसार, त्रिफळा डोळ्यांशी संबंधित समस्या म्हणेजच संसर्ग, डोळ्यांची जळजळ, वेदना आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करू शकते. त्रिफळा पावडर घेण्यासोबतच, तुम्ही ते आय वॉश म्हणून देखील वापरू शकता. एक चमचा त्रिफळा पावडर एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. सकाळी ते मऊ कापड किंवा कॉफी फिल्टरमधून गाळा. पाण्यात त्रिफळा कण राहणार नाहीत याची खात्री करा. त्रिफळा पाण्यापासून पूर्णपणे वेगळे झाल्यावर, या पाण्याने डोळे धुवा.त्यामुळे डोळे स्वच्छ आणि निरोगी बनतील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






