Marathi News

दररोज सकाळी प्या ‘हे’ ड्रिंक, नैसर्गिकरित्या वितळेल लिव्हरवर जमा झालेली चरबी

Published:
फॅटी लिव्हरवर औषधे आणि जीवनशैलीतील बदलांनी योग्य उपचार करता येतात.
दररोज सकाळी प्या ‘हे’ ड्रिंक, नैसर्गिकरित्या वितळेल लिव्हरवर जमा झालेली चरबी

Home remedies for fatty liver:   फॅटी लिव्हर ही लिव्हरच्या सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे. ज्यामध्ये लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होते. जास्त प्रमाणात मद्यपान, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यासारख्या परिस्थितींमुळे हे होऊ शकते. फॅटी लिव्हर असलेल्या बहुतेक लोकांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, म्हणूनच त्याचे निदान उशिरा होते.

फॅटी लिव्हरवर औषधे आणि जीवनशैलीतील बदलांनी योग्य उपचार करता येतात. आहार लिव्हरमधील अतिरिक्त चरबी विरघळण्यास देखील मदत करू शकतो. असे काही ड्रिंक्स आहेत जे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट केले तर, फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.जाणून घेऊया हे ड्रिंक्स कोणते आहेत……

लिंबू आणि ऍपल सायडर व्हिनेगरचे ड्रिंक-
तुम्ही एक ग्लास पाण्यात लिंबू आणि ऍपल सायडर व्हिनेगर मिसळूनदेखील पिऊ शकता. लिंबू शरीरातील पित्त क्षार वाढवण्यास मदत करू शकते, जे प्रत्यक्षात लिव्हरला अतिरिक्त कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते.

ग्रीन टी-
ग्रीन टी हे फॅटी लिव्हरच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी देखील एक फायदेशीर ड्रिंक आहे. ग्रीन टी लिव्हरमधील एंजाइम ALT आणि AST कमी करण्यास मदत करते. जेव्हा हे एंजाइम वाढतात तेव्हा ते तुमच्या लिव्हरवरील ताण वाढल्याचे दर्शवते. ग्रीन टीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करणारे गुणधर्म देखील असतात. म्हणून, दररोज ग्रीन टी पिणे खूप फायदेशीर ठरू शकते.

हळदीचा चहा-
फॅटी लिव्हरमध्ये, तुम्ही तुमच्या आहारात हळदीचा चहा किंवा हळदीचे दूध देखील समाविष्ट करावे. डॉक्टर म्हणतात की हळद हा सर्वात शक्तिशाली अँटी इन्फ्लीमेंट्री पदार्थांपैकी एक आहे जो तुम्ही खाऊ शकता, विशेषतःलिव्हरचे आजार दूर करण्यासाठी.

बीटचे ड्रिंक-
बीटच्या रसाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ते नायट्रिक ऑक्साईड वाढवते, जे रक्तदाब व्यवस्थापित करण्यास मदत करते. ते जळजळ कमी करण्यास देखील मदत करू शकते. बीट बीटेनसमृद्ध आहे, हे एक नैसर्गिक रसायन आहे जे लिव्हरला डिटॉक्स करण्यास मदत करते. बीटच्या रसात ग्लूटाथिओनचे प्रमाण जास्त असते, जे लिव्हरची विषारी पदार्थ काढून टाकण्याची क्षमता वाढवते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews