MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

दररोज प्या गोकर्णीच्या फुलांचा निळाशार चहा, ताणतणाव दूर होण्यासपासून मिळतील अनेक फायदे

Published:
गोकर्णीच्या फुलांचा निळाशार चहा पिल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.
दररोज प्या गोकर्णीच्या फुलांचा निळाशार चहा, ताणतणाव दूर होण्यासपासून मिळतील अनेक फायदे

Gokarna flower tea benefits:   आयुर्वेदात विविध फुले अणि पानांचे आरोग्यदायक फायदे सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एक म्हणजे गोकर्णीचे फुल होय. गोकर्णीच्या फुलांचा वापर औषध म्हणून केला जातो. शिवाय अनेक औषधांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये त्याचा वापर केला जातो. शतकानुशतके गोकर्णीच्या फुलांचा वापर करून अनेक शारीरिक आजार सहजपणे दूर केले जातात.

गोकर्णीच्या फुलांचा निळाशार चहा पिल्याने अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते. गोकर्णीच्या फुलांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीडायबेटिक गुणधर्म असतात. आज आपण या लेखात गोकर्णीच्या फुलाच्या चहाचे विविध फायदे जाणून घेऊया…..

 

वजन कमी करण्यास फायदेशीर-

आजकाल बदलेली जीवनशैली, बैठे काम आणि बाहेरील खानपान यामुळे वजन वेगाने वाढत आहे. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करूनही फायदा मिळत नाही. अशावेळी गोकर्णीच्या फुलांचा चहा वजन कमी करण्यास मदत करू शकतो. या चहामुळे मेटाबॉलिज्म वाढतो. त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत मिळते.

ब्लड प्रेशर नियंत्रित करते-
गोकर्णीच्या फुलांचा चहा मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतो. जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. दररोज डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात हा चहा पिल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.

डायबिटीस नियंत्रित करते-
डायबिटीसच्या रुग्णांसाठी गोकर्णीच्या फुलांचा चहा अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हा चहा शरीरातील इन्सुलिन स्पाइक रोखण्यास मदत करते. ज्यामुळे साखरेची पातळी वाढत नाही.

 

झोप सुधारण्यास मदत होते-

आजकाल अनेकांना रात्री चांगली झोप न येण्याची समस्या असते. अशा लोकांसाठी गोकर्णीच्या फुलांचा चहा फारच फायदेशीर आहे. यामध्ये असलेले गुणधर्म ताणतणाव दूर करण्यास आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते-
गोकर्णीच्या फुलांचा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. या मध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवून विविध आजार दूर करण्यास मदत करते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)