हिरड्या निरोगी आणि मजबूत ठेवायच्या आहेत? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Published:
हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने हिरड्यांना सूज येणे आणि रक्त येण्याच्या समस्या वाढू शकतात.
हिरड्या निरोगी आणि मजबूत ठेवायच्या आहेत? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

Tips for keeping gums healthy:   निरोगी आणि मजबूत दात आणि हिरड्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. कमकुवत आणि किडलेल्या दातांमुळे खाणेपिणे कठीण होऊ शकतेच, शिवाय अनेक आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात.
परंतु, तुमच्या दातांची संपूर्ण रचना हिरड्यांवर अवलंबून असते.म्हणजेच जर हिरड्या कमकुवत झाल्या तर तुमचे दात देखील खराब होतील.

हिरड्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने हिरड्यांना आलेली सूज, पिरियडोंटायटीस, हिरड्यांमधून रक्त येणे आणि पायरियासारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळेच आज आपण हिरड्या निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी काय-काय करता येते याबाबत जाणून घेऊया…..

दोनवेळा दात घासणे-
दिवसातून दोनदा आणि कमीत कमी दोन मिनिटे दात घासा. फ्लोराईड असलेले टूथपेस्ट वापरा.जे दातांच्या इनॅमलला मजबूत करते आणि दातांना पोकळींपासून वाचवते. तुम्ही इलेक्ट्रिक टूथब्रश देखील वापरू शकता. जो डेंटल प्लेककाढून टाकण्यासाठी फारच चांगला आहे.

फ्लॉसिंग करणे-
दात आणि हिरड्यांवरील घाण आणि अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी दिवसातून एकदा फ्लॉस करा. कधीकधी टूथब्रश तुमच्या दातांमध्ये पोहोचू शकत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक जेवणानंतर फ्लॉस करू शकता.

जेवल्यानंतर चूळ भरणे-
दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी ब्रश करणे पुरेसे नाही. जेवणानंतर नेहमी पाण्याने चूळ भरणेदेखील महत्त्वाचे आहे. यामुळे दातांमध्ये आणि हिरड्यांवर अडकलेले अन्नाचे कण निघून जातात.

योग्य आहार-
हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी गोड आणि चघळायच्या पदार्थांचे सेवन मर्यादित करा. या पदार्थांमुळे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. सफरचंद,ओवा आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखे फायबरयुक्त पदार्थ तोंडाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)