Gut health Marathi tips: आपली पचनक्रिया चांगली असल्यास अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. आतडे निरोगी असतील तर पोषक तत्वांचे शोषण चांगल्या प्रकारे करण्यास मदत होते. ज्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतात. या प्रक्रियेत प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर मानले जाते. परंतु आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फक्त प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करणे पुरेसे नाही. तुम्हाला निरोगी प्रोटीन स्रोतांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, तुम्ही वापरत असलेल्या प्रोटीनचा स्रोत तुमच्या आतड्याच्या मायक्रोबायोटामध्ये बदल करू शकतो. हा बदल थेट पचनावर परिणाम करतो. म्हणून आतड्याच्या आरोग्यासाठी योग्य प्रोटीन निवडणे अत्यंत महत्वाचे आहे.आज आपण चांगल्या पचनासाठी काही उत्तम प्रोटीनचे स्रोत जाणून घेऊया….
दही –
पोटातील गॅस, पोटफुगी आणि आम्लपित्त कमी करण्यासाठी दह्याचे सेवन करा. जेवणासोबत थोड्या प्रमाणात दही खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते. त्यातील चांगले बॅक्टेरिया आतड्यांतील हालचाली संतुलित करतात.
जवस-
जवसाच्या बिया आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असतात. जे आतड्यांचा दाह कमी करतात. ते दररोज योग्य प्रमाणात खा.
मसूर –
जर तुम्ही प्रोटीनसाठी शाकाहारी पर्याय शोधत असाल तर मसूर आणि सोयाबीनचा विचार करा. मसूरमध्ये सोयाबीन मिसळून कबाब बनवा आणि त्यांचे सेवन करा. मसूर आणि सोयाबीन कबाब खाल्ल्याने प्रथिनांची कमतरता दूर होण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होईल.
मुग डाळ –
मूग डाळ हलकी, सहज पचण्याजोगी आणि प्रोटीनसमृद्ध असते. पोषणतज्ञसांगतात की ज्या लोकांची पचनक्रिया खराब आहे त्यांनी मुग डाळ खावी. त्यात फायबर असते, जे आतड्यांच्या हालचाली सुलभ करते.
पनीर –
पनीर हा पचनक्रिया सुधारण्यासाठी एक उत्तम प्रोटीन आहे. त्यात कॅल्शियम आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतात आणि योग्य प्रमाणात पनीर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. पॅकेज्ड पनीर खाण्याऐवजी घरी ताजे, कमी चरबीयुक्त पनीर बनवण्याचा प्रयत्न करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






