Sat, Dec 27, 2025

दोन आठवड्यात थांबेल केस गळती, फक्त ट्राय करा स्वयंपाकघरातील ‘हे’ उपाय

Published:
तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय केस गळती रोखायची असेल, तर घरगुती उपायांपेक्षा चांगला पर्याय नाही.
दोन आठवड्यात थांबेल केस गळती, फक्त ट्राय करा स्वयंपाकघरातील ‘हे’ उपाय

Home Remedies to Prevent Hair Fall:   आजकाल केस गळण्याची समस्या जवळजवळ प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांना त्रास देत आहे. ही समस्या आहार, ताणतणाव आणि अनेकदा हवामानाशी जोडलेली असते. सध्या हिवाळा सुरु आहे आणि अनेकांना केस गळतीचा त्रास होत आहे. हिवाळ्यात थंड वातावरण, प्रदूषण यामुळे केसांच्या विविध समस्या निर्माण होतात.

हिवाळ्यात केस गळती रोखण्यासाठी काय करावे असा प्रश्न्न अनेकांना पडतो. जर तुम्हाला कोणत्याही दुष्परिणामांशिवाय केस गळती रोखायची असेल, तर घरगुती उपायांपेक्षा चांगला पर्याय नाही. आज आपण असेच काही घरगुती उपाय पाहूया जे केस गळती रोखण्यास मदत करू शकतात…..

आवळा पाणी-
आवळा हा व्हिटॅमिन सीचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. जो कोलॅजन उत्पादन वाढवतो आणि टाळूचे आरोग्य सुधारतो. वाळलेला आवळा रात्रभर भिजवून सकाळी पाणी पिल्याने केस जाड आणि मजबूत होतात.

धण्याचे पाणी-
धण्यामध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. धणे पाण्यात उकळा, गाळून घ्या आणि दररोज सकाळी प्या. धणे रक्त शुद्ध करते. ज्यामुळे टाळूला चांगले पोषण मिळते. आणि केस गळती थांबून केस वाढण्यास मदत होते.

मेथीचे पाणी-
मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड असते. जे केसांची मुळे मजबूत करते. मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजवा आणि सकाळी पाणी गाळून घेऊन प्या. यामुळे केस गळती कमी होण्यास आणि नवीन केस वाढीस चालना मिळण्यास मदत होते.

कोरफडीचे पाणी-
कोरफडीमध्ये एंजाइम आणि अमीनो अॅसिड असतात. जे केसांच्या मुळांना नवी ऊर्जा देतात. दररोज सकाळी कोमट पाण्यात २ चमचे कोरफडीचे जेल मिसळून प्यायल्याने केसांची गुणवत्ता सुधारते. केस गळणे थांबतात.

कांद्याचे पाणी-
कांद्याचे पाणी जरी चवीला चांगले नसले तरी, कांद्याचे पाणी सल्फरने समृद्ध असते. त्यामुळे ते केसांच्या मुळांना उत्तेजित करते. त्यामुळे केस गळणे थांबून वाढ होण्यास सुरुवात होते. आठवड्यातून २-३ वेळा कोमट कांद्याचे पाणी प्या.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)